AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chiplun Rain Update : चिपळूणमध्ये डोंगराला 4 फुटापर्यंत भेगा पडल्या, गावकरी चिंतेत; एनडीआरएफच्या जवानांनी दिला आधार

रत्नागिरीतील अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड अद्याप हटवलेली नाही. पावसामुळे प्रचंड व्यत्यय येत असल्याचे समजले आहे. त्यामुळे अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

Chiplun Rain Update : चिपळूणमध्ये डोंगराला 4 फुटापर्यंत भेगा पडल्या, गावकरी चिंतेत; एनडीआरएफच्या जवानांनी दिला आधार
डोंगराला 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2022 | 8:37 AM
Share

मुंबई – चिपळूण (Chiplun) मधील कळकवणेमध्ये (Kalkavत स्थळी हलवले आहे. डोंगराला मोठ्या भेगा पडल्यामुळे गावकरी अधिक चिंतेत आहेत. एनडीआरएफच्या (NDRF) जवानांनी केली घटनाan) एनडवाडीतल्या वस्तीच्या मागील डोंगराला 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ अधिक भयभीत झाले आहेत. त्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून तात्काळ नियोजन करावं अशी मागणी केली आहे. एनडवाडीतल्या ग्रामस्थांना प्रशासनाने सुरक्षिस्थळाची पाहणी केली आहे. त्यामुळे धोकादायक कुटुंबांना स्थलांतरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या जवानांनी तिथल्या ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर केली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एक आधार निर्माण झाला आहे. मागच्या आठ दिवसांपासून कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

4 तारीखेला परशुराम घाट बंद करण्याचा निर्णय झाला

मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक परशुराम घाटात पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. 4 तारीखेला या घाटात दरड कोसळल्या नंतर घाट केवळ 2 वेळा 1 तासा साठी खुला करण्यात आला होता. मात्र घाट बंद असल्यामुळं अवजड वाहनांच्या रांगा चिपळूण आणि खेर्डी या भागात वाढत आहेत यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. 4 तारीखेला परशुराम घाट बंद करण्याचा निर्णय झाला. सलग 5 दिवस घाट बंद होता . अवजड वाहनांच्या रांगा वाढत होत्या म्हणून 6 दिवसांनी घाट फक्त 1 तास साठी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतर लगेच घाट बंद करण्यात आला. यानंतर घाट 12 तारीखेला सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. पण 12 तारीखेला घाट सुरू झाला नाही म्हणून वाहन चालक रोडवर उतरले. त्यावेळी पोलिस आणि चालक यांच्यात राडा झाल्याचे समजले.

अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे

रत्नागिरीतील अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड अद्याप हटवलेली नाही. पावसामुळे प्रचंड व्यत्यय येत असल्याचे समजले आहे. त्यामुळे अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट बंद आहे. मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्यांवर देखील झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात नद्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर घाट रस्त्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.