AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, महायुती सरकारमधील मंत्र्याची प्रथमच मोठी कबुली

"अजित पवार हे जाणीवपूर्वक हे करत असावेत, हा माझा आक्षेप नाही. जे त्यांना गाईड करणारे आहेत, अकाऊंट खात्यातले, त्यांनी दिशाभूल केली असावी. माझ्या खात्याचा हक्काचा निधी मला मिळला पाहिजे"

Ladki Bahin Yojana : 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, महायुती सरकारमधील मंत्र्याची प्रथमच मोठी कबुली
mahayuti Image Credit source:
| Updated on: May 05, 2025 | 1:37 PM
Share

“खात्यावर अन्याय होता कमा नये. जर हा पैसा अशा पद्धतीने गेला, तर काही योजना ठप्प होतील. आत्ताच माझं जवळपास 3 हजार कोटी देणं आहे. मुख्यमंत्रीसाहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की, तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा. जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याच आश्वासित करा. तसं पत्र त्यांना दिलेलं आहे. अजितदादांना सुद्धा बोललो आहे” असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महायुती सरकारमध्ये खात्याच्या निधी वाटपावरुन विसंवाद वाढला आहे. आज संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेतून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

“बजेट विधिमंडळात पास केलं, म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीय. तुम्ही देतानाच परिपूर्ण द्या, म्हणून त्यांच्यावर आक्षेप आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात फाईल माझ्याकडे आलेली. आपण या खात्यातून दलित, अल्पसंख्यांकांना सुविधा देत आहोत. आदिवासी विभाग वेगळा आहे. आपण माझ्या खात्यातून पैसा कट करु नये असं त्यांना स्पष्टपणे सांगितलय” असं संजय शिरसाट म्हणाले.

लाडकी बहिण योजनेबद्दल काय म्हणाले?

“लाडकी बहिण योजनेमुळे सरकार आलं. त्यावर आक्षेप घेण्याच कारण नाही. या पद्धतीने पैसे कमी करु नका. इतर अनेक मार्ग आहेत. लाडकी बहिण योजनेच सरकारवर थोडसं बर्डन आहे हे सर्व मान्य करतात” ही कबुली संजय शिरसाट यांनी दिली. “ही योजना बंद होऊ नये. पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची धारणा आहे. आमदाराला निधी कमी, जास्त देणं हा भाग वेगळा आहे. पण खात्याला वर्गीकरण करुन पैसे दिले जातात. तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात, ते बंधनकारक आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.

‘माझ्या खात्याचा हक्काचा निधी मला मिळला पाहिजे’

“अजितदादांवर राग आहे का? हे शकुनी मामा कोण? हे जे कोणी प्रश्न निर्माण करतायत, त्याच्याशी काही देणघेणं नाही. मी त्या भागडीत पडत नाही. मी माझ्या खात्यापुरता पाहतो” असं संजय शिरसाट म्हणाले. “पैसे नसतील तर अडचण येणार. काही मुलांना पैसे देऊ शकलो नाही. जर असा निधीला कट बसला, तर हा त्रास जाणवणार” असं संजय शिरसाट म्हणाले.

‘भले कर्ज काढावं लागेल’

“राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे. लाडकी बहिण योजनेत 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा वेगळ्या अर्थाने बाऊ करतात. योजना बंद करणार का? आमची जी कमिटमेंट आहे, ती पूर्ण करणार. राज्यावर आर्थिक भार आला आहे. त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल. 1500 रुपये मिळणार एवढं नक्की” असं संजय शिरसाट म्हणाले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.