AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदूरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टर करतोय आदिवासींवर बिनधास्त उपचार, प्रशासनाचे दुर्लक्ष

राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. या भागात एक बारावी शिक्षण झालेला तरुण आदिवासींवर बिनधास्त उपचार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

नंदूरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टर करतोय आदिवासींवर बिनधास्त उपचार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Bogus doctor
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 5:21 PM
Share

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इथे गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेत एका बोगस डॉक्टरने आदिवासींच्या जीवाशी खेळ मांडला आहे. ना कोणती पदवी, ना कोणता परवाना, केवळ १२ वीपर्यंत शिक्षण असलेला एक तरुण स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत सातपुड्याच्या दुर्गम भागात आपला धंदा चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.

सातपुड्याचा दुर्गम डोंगरऱ्यांचा भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील गुंडाचापडा परिसरात सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एका बोगस दवाखान्याचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पश्चिम बंगालच्या कोलकात्याहून आलेला हा बंगाली डॉक्टर आदिवासी बांधवांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांच्या आयुष्याशी खेळत होता.

या तथाकथित डॉक्टरचे नाव आहे विचित्र बाबू मंडल असे आहे. हाताशी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हा पठ्ठ्या बिनधास्तपणे  स्टेथोस्कोप लावून रुग्णांची तपासणी करायचा आणि त्यांना थेट औषधांचे डोस लिहून द्यायचा. धक्कादायक बाब म्हणजे, हा बोगस डॉक्टर स्वतःच मान्य करतोय की तो १२ वी पास आहे. मात्र, तरीही तो रुग्णांना हाय-डोस औषधे तयार करून देत होता. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून दुर्गम भागात त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. शासनाने दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी भागात असा बोगस डॉक्टरांनी आपले दुकान थाटले असून आदिवासींच्या जीवाशी त्यांचा खेळ सुरु आहे.

आरोग्य विभागाचे मोठे दुर्लक्ष

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात असे विचित्र डॉक्टर फोफावले आहेत. आता या बोगस डॉक्टरची कबुली तर समोर आली आहे, पण यावर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Follow Us
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत