weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. (rain in January month)

weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

मुंबई : उत्तर भारतासह राज्यात हुडहुडी वाढलेली असतानाच आज ( 4 डिसेंबर) राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर मुंबई तसेच उपनगरांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. (in state there is likely to rain between 6 and 7 January)

मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्याची चाहुल आज सकाळी मुंबईत लागली . होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज सकाळी राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर मुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी हलक्या तसेच रिमझिम स्वरुपाचा पाऊस पाडला. मुंबईत थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढली होती. मात्र पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या कारणामुळे पुढील काही दिवसांत पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तसेच, उत्तर भारतासह दिल्लीमध्येही काही ठिकणी पावसाच्या सरी बरसल्या असून पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपून थंडीची तीव्रता वाढली होती. त्यानंतर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात 6 ते 7 जानेवारी दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे. या दरम्यान 16 ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

संबंधित बातम्या :

6 ते 7 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; तापमानाचा पाराही घसरणार

Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?

(in state there is likely to rain between 6 and 7 January)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI