AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानं टेन्शन वाढवलं, आज राज्यात एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात शनिवारी 53 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1,967 वर पोहोचला आहे.

कोरोनानं टेन्शन वाढवलं, आज राज्यात एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 14, 2025 | 9:28 PM
Share

महाराष्ट्रात शनिवारी 53 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1,967 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे राज्यात आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हा 27 वर पोहोचला आहे. मात्र यातील 26 रुग्णांना कोरोनापूर्वीच इतरही काही आजार होते.

आज महाराष्ट्रात कोरोनाच्या 53 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये 24 रुग्ण, पुणे 11, ठाणे 5, पिंपरी चिंचवड 3 तर नागपूर, पुणे ग्रामीण, सागंली आणि रायगडमध्ये प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत राज्यात कोरोनाच्या एकूण 21,067 टेस्ट करण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबई शहरामध्ये जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 829 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यांची कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आढळून आली आहे, अशा रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण दिसून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.यातील अनेकांना होम क्वॉरटाईंन करण्यात आलं आहे, तर ज्यांची प्रकृती गंभीर आहेत, अशा रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशात सध्या एकूण 7,400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाच्या 269 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अधिक वेगानं पसरत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र ज्या रुग्णांची टेस्ट ही पॉझिटिव्ह आढळून आली आहे, त्यांच्यामध्ये सौम्य लक्षण आढळून आली आहेत, यातील अनेक रुग्ण हे होम क्वॉरटाईंनमध्येच बरे होत आहेत. तर ज्यांचा मृत्यू झाला आहेत, त्यातील अनेकांना इतर आजार असल्याचं देखील समोर आलं आहे.

आरोग्य विभागाची आकडेवारी

आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या स्थितीमध्ये एकूण 7,400 कोरोनाचे रुग्ण आहेत.तर जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत 11967 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.