AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा हव्या, तो आकडा आला समोर, भाजप इतक्या जागा देईल का?

आगामी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतील. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा हव्या? त्याचा आकडा समोर आला आहे.

BMC निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा हव्या, तो आकडा आला समोर, भाजप इतक्या जागा देईल का?
Eknath Shinde
| Updated on: Oct 29, 2025 | 10:06 AM
Share

राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती, आघाडी मध्ये लढायच्या की, स्वबळावर यावर विविध राजकीय पक्षांकडून वक्तव्य सुरु झाली आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती मुंबई महानगरपालिकेची. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच वर्चस्व आहे. मात्र, आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर चित्र बदलणार का? ते पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाइतकीच भाजपची ताकद झाली आहे. मागच्या दोन निवडणुकीत भाजपने मुंबईत निम्म्या विधानसभेच्या जागा जिंकल्या.

यावेळी काहीही करुन मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंकडून काढून घ्यायची, तिथे भाजपचा झेंडा फडकवायचा असा चंग भाजपने बांधला आहे. त्यात शिवसेनेत पडलेले दोन गट यामुळे यंदाची महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी परीक्षा असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवणार असं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून सांगितलं जातय. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटपावरुन पेच फसू शकतो. महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना जिंकलेल्या जगांसाठी आग्रही आहे. वरिष्ठ सुत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली आहे.

50 ते 60 नगरसेवक हे शिंदेसेनेत

2017 साली जिंकलेले नागरवसेवक जे आता शिंदेसेनेत आहेत, त्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे. 2017 साली शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या होत्या. त्यातील आता जवळपास 50 ते 60 नगरसेवक हे शिंदेसेनेसोबत आहेत. सर्व जागा आम्हाला मिळाव्या ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे. इतर उरलेल्या जागांमध्ये समसमान वाटप व्हावं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ही मागणी आहे. मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत. त्यातील किमान 100 ते 110 जागा मिळाव्यात ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात भाजपचा जोर आहे. विधानसभेला मुंबईतही एकनाथ शिंदे यांनी काही जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिंकलेल्या जागा परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.