AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis : हे शत्रूला हे माहित आहे, म्हणून ते.. फडणवीस यांचं महत्वाचं वक्तव्य

CM Devendra Fadnavis : "21 ते 22 वर्षांपर्यंत आपण या सगळ्यापासून दूर राहीलो तर कधीच या गोष्टीकडे वळत नाही. कोणीही किती आमिष दाखवलं तर त्याला नाही म्हणा. मजा येते अस कोण सांगत असेल तर त्याला सांगा की मजा नाही ही सजा आहे म्हणून बरबाद करू नको. आम्हाला हे सांगायला हवं. शपथ म्हणजे औपचारिक नाही हे एक बंधन आहे" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis : हे शत्रूला हे माहित आहे, म्हणून ते.. फडणवीस यांचं महत्वाचं वक्तव्य
CM Devendra Fadnavis
| Updated on: Jul 30, 2026 | 12:57 PM
Share

महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीत झाला. हजारो शालेय चिमुरड्यांना सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम वरळी येथे देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज फ्री समाजाची शपथ दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशमुक्त भारताच संकल्प केला आहे, त्यासाठी आपल्याला देखील ड्रग्स फ्री मुंबई आणि महाराष्ट्र करणे गरजेचे आहे. जगातील आपण चौथी अर्थ व्यवस्था, स्पेस क्षेत्रात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा आपण विक्रम केला. अमेरिकेनंतर आपण हे सगळ केलं आहे. Ai असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. यात भारत वेगाने प्रगती करत आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“त्याचवेळी संरक्षण क्षेत्रात भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी देखील दाखवून दिलं, हा जूना भारत नाही नवीन भारत आहे. पाकिस्तानात घुसून मारणार हे कळलं आहे. हा भारत युवांचा आहे. सगळ्यात अधिक तरुणाई आपल्या भारतात आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

म्हणूनच एक नवीन पद्धत सुरू झाली

“ही तरुणाई योग्य दिशेने गेली तर जगाचा महागुरू म्हणून स्थापित होऊ शकतो. हे शत्रूला हे माहित आहे. भारताला पराजित करता येत नाही, भारताची ताकद वाढत आहे. म्हणूनच एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. भारताला आतून पोकळ करायचं. ज्या तरुणाईच्या माध्यमातून भारत पुढे येणार त्याच तरुणाईला व्यसनाधीन केलं आणि दिशा भटकून टाकली तर खोकला होईल, पोकळ होईल असं छुपं युद्ध सुरू झालं आहे” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सामायिक युद्ध पुकारावं लागेल

“वॉरच मुख्य शस्त्र ड्रग्स आहे. युवा शक्तीला व्यसनाच्या अधीन करून भविष्यात नेस्तनाबूत करायचं अस षडयंत्र सुरू आहे. ही लढाई साधी नाही, घरगुती लढाई पण नाही. दुर्देवाने या षडयंत्रात आपल्या देशातील काही शक्ती पैसे कमावण्यासाठी सामील झाल्या आहेत. या करता आपल्याला देखील त्यांच्या विरुद्ध सामायिक युद्ध पुकारावं लागेल. यामध्ये बरेच विभाग आहेत पण विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांना एकत्रित काम करावं लागेल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जेल मध्ये टाकणे हे महत्त्वाचे

“एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्यासाठी पोलिस काम करतीलच पण आपण विद्यार्थ्यांनी ठरवलं नो ड्रग्स तर कोणाची हिंमत आहे विक्री आणि वाटप करायची. सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून जुहूत ड्रग्स तयार होतात, तिथे सगळ्या ठिकाणी कारवाई होईल. शाळा, कॉलेज आजूबाजूला दर्गा विक्री करणाऱ्यांना शोधून काढणे आणि जेल मध्ये टाकणे हे महत्त्वाचे आहे. अस काम केलं तर पुढील दोन ते तीन वर्षात ड्रग्स फ्री करण्यात आपण यशस्वी होऊ” फडणवीस म्हणाले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा