AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढील 24 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून..

Maharashtra Weather Update : ऐन दिवाळी तोंडावर असताना भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर संकट! 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट, पुढील 24 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून..
Thunderstorm Rain
| Updated on: Oct 17, 2025 | 6:58 AM
Share

काही दिवसांपूर्वी राज्यात पाऊस झोडपताना दिसला. अनेक भागात मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक वाहून गेले. विशेष: मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. मॉन्सून राज्यातून गेल्याचे सांगितले जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे, कोकण, मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाहीये. 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातील लक्षव्दीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहे. केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला. यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळतंय.

मराठवाड्यातील काही भागात, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला. काल सायंकाली ठाणे जिल्हात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता. भारतीय हवामान विभागाने 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा  निर्माण होण्याचे संकेत आहेत.

यामुळे हे स्पष्ट आहे की, राज्यातून मॉन्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कामयमच राहणार आहेत. 19 आँक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. या पावसाचा अधिक प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. 15 जिल्हांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...