AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांनो दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळा, राज्यावर दुहेरी संकट, थेट..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही भागात अवकाळी पाऊस बरसणार आहे.

नागरिकांनो दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळा, राज्यावर दुहेरी संकट, थेट..
warning
| Updated on: Apr 23, 2026 | 7:14 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. सध्या राज्यावर दुहेरी संकट आहे. उष्णतेसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे पिकांची वाट लागली असून शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यामध्येच आजही पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला. कोकणासह अन्य भागात आज उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय पडू नये. सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, धाराशिव, कोल्हापूर, लातूर, नांदेड या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता. आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्र, पावसाचा येलो अलर्ट जारी.  वादळी पाऊस होणार असल्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव,लातूर, परभणी, बीड, चंद्रपूर ,यवतमाळमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी.

हवामानातील बदलाचा फटका आरोग्यावरही दिसत आहे. करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. करमाळा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील कंदर, सातोली गावासह काही भागात गारांचा पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागाला अवकाळी पाऊस व गारपीटीने चांगले झोडपले.  येवल्याच्या कुसुर कुसमाडी अंकाई नायगव्हाण या गावातील शेकडो हेक्टर कांदा शेती उध्वस्त झाली आहे. कुसमाडी येथील दिलीप मेंगाळ या शेतकऱ्याचा काढणीस आलेला दहा एकर कांदा गारपिटीमुळे खराब झाल्याने उत्पादन खर्च व उत्पन्न वाया गेल्याने शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी केली.

Follow Us
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....