AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! दुपारी घराबाहेर पडणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट..

Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळण्याचे संकेत आहेत.

सावधान! दुपारी घराबाहेर पडणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट..
heat wave
| Updated on: Mar 26, 2026 | 7:16 AM
Share

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. मागील आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातून अवकाळी पावसाचे ढग काही जाण्याचे नाव घेत नाहीत. आजही मराठवाड्यासह काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच कोकणात उष्ण आण दमट हवामानाची इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. चंद्रपूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, गडचिरोली, यवतमाळ या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे रत्नागिरी, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यासोबतच दुपारी 12 ते 4 नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असेही सांगण्यात आले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात गारपिटही होण्याची शक्यता आहे. लातूर, नांदेड, बीड, सोलापूर या भागात अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसांपासून सतत हजेरी लावताना दिसत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला राज्यातील अनेक भागात २० मार्चपर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याचे सांगितले गेले होते.

आता २६ मार्च आला तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. हवामानातील बदलाचा परिणाम शेती पिंकावरही होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर पंचनामे करणे सुरू आहेत. राज्यातील काही भागात पाऊस तर काही भागात कडाक्याचे उन्ह अशी स्थिती सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे.

सांगली शहरासह मिरज परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आलेल्या या पावसामुळे सांगलीकरांची चांगलीच फजिती उडाली. सकाळपासून सांगलीचा परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढला होता. त्यामुळे उघड्याने सांगलीकर हैराण झाले होते, सायंकाळी पडलेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...