AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राच्या ‘त्या’ भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश; मच्छिमारांसाठी सूचना काय?

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अरबी समुद्र किनारपट्टी वरती अलर्ट जारी झाला असून समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे.

समुद्राच्या 'त्या' भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश; मच्छिमारांसाठी सूचना काय?
प्रातिनिधक फोटोImage Credit source: social media
| Updated on: May 09, 2025 | 10:49 AM
Share

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील विविध महत्वाच्या, संवेदनशील भागात अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थाही चोख तैनात करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अरबी समुद्र किनारपट्टी वरतीही अलर्ट जारी केला आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे.

भारत -पाकिस्तानचे युद्धाचे ढग पुन्हा घोंगावू लागले असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच ऑफशोअर डिफेन्स एरियामध्ये मच्छिमारांना मासेमारी करता येणार नसून त्या क्षेत्रात बोट आढळल्यास थेट शूट-टू-किलचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेचा विशेष प्लॅन

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अरबी समुद्र किनारपट्टी वरती अलर्ट जारी झाला असून समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे. तटरक्षक दल, कस्टम, सागरी किनारा पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सध्या किनारपट्टी भागात गोपनीय पद्धतीनं गस्त घालण्यात येत आहे. खास करून रात्रीच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेचा विशेष प्लॅन आखण्यात आला आहे.

तसेच खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या बोटींनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीच्या लँडिंग पॉईंट वरती विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अरबी समुद्रातील बारीक-सारीक हालचालींवर तटरक्षक दलाचं बारीक लक्ष आहे. एवढंच नव्हे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात यंत्रणा अलर्टवर आहेत.

‘त्या’ भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश

तसेच भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खालील सूचनांचा समावेश आहे –

१) भारतीय नौसेनेकडून समुद्रात ODA (ऑफशोअर डिफेन्स एरिया) या क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही… ह्या क्षेत्राल बोटी आढळ्यास शूट-टू-किल चे आदेश देण्यात आले आहेत. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या क्षेत्राचा आश्रय घेऊ नये.

२) मत्स्यवयसाय विभागातील LO ह्यांना सहकार्य करावे, कारण देशाची सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमारांवर सुद्धा असल्याने या कठीण परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनांना सहकार्य करावे, ही विनंती.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.