AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक, भारताने पाकला धडा शिकवताच म्हणाले, भारताचं नेतृत्व…

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर रात्रीच्या वेळी पाकिस्तानात मिसाइल हल्ला केला. या कारवाईत अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली. शरद पवार यांनी या कारवाईचे कौतुक केले आणि भारतीय सेनेचे कामगिरीचे स्तुतिगान केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरही भाष्य केले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.

शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक, भारताने पाकला धडा शिकवताच म्हणाले, भारताचं नेतृत्व...
Image Credit source: social media
| Updated on: May 07, 2025 | 10:19 AM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाण पर्यटकांचा बळी गेला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने काल मध्यरात्री 1.30च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाइल हल्ला केला. त्यामध्ये जवळपास 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईचे देशभरातून कौतुक होत असून पहलगामचा बदला घेण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

सामान्य नागरिकांप्रमाणेच देशातील अनेक राजकीय नेत्यांनीही या कारवाईचे कौतुक केले असून देशातील ज्येष्ठ नेते, राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. आज सकाळीच त्यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले होते. त्यानंतर काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतंही अंतर नाही हे जगाला कळलं. आज सगळा देश AIR फोर्सच्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप बहिणीचे कुंकू पुसलं गेलं होतं, त्यामुळे भारत सरकारने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईला दिलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव अतिशय योग्य असल्याचेही शरद पवार म्हणाले.

आज संपूर्ण देश सेनेच्या पाठिशी ठामपणे उभा

गेल्या काही आठवड्यात देशात जे घडलं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. लोकं पलीकडून येतात, हल्ला करतात. पण यामध्ये सरकारला कुठलीही बघ्याची भूमिका घेता येत नाही. जो काश्मीरचा भाग पाकिस्तान घेतला (पाकव्याप्त काश्मीर) तिथं हल्ला केला आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथं दारूगोळा ठेवला जातो. पाकिस्तानची बॉर्डर आपण ओलांडून गेलो नाही ती काळजी हवाई दलाने घेतली. काश्मीरमध्ये जे काही झालं त्यांनतर देशातील काही लोकांच्या मनात काश्मिरी लोकांबाबत शंका होती. जम्मू काश्मीर विधानसभेत अधिवेशन घेऊन या हल्ल्याचा निषेध केला गेला. मुख्यमंत्री यांनी भाषणात त्यांनी स्वच्छ भूमिका घेतली . भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतंही अंतर नाही हे जगाला कळलं आहे, असं शरद पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आक्रमक अशी प्रतिमा जाऊ नये. आज सगळा देश AIR फोर्स च्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका असल्यातंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

सतर्क राहण्याची गरज आहे

भारतात दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारताने कारवाई करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिले. हल्लाच्या या ॲक्शननंतर अमेरिका, जपान या देशांनी भारताला समर्थन दिले आहे. मात्र चीनने समर्थन दिलं नाही ही काळजी करण्यासारखी गष्ट असल्याचे पवार म्हणाले. युद्ध होईल की नाही आज सांगणं योग्य नाही मात्र सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानला त्यांची आणि भारताची ताकत माहित आहे त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने पाऊल टाकली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्टक मारले गेले. त्यात अनेक निष्पाप बहिणींचे कुंकू पुसलं गेलं. त्यामुळे भारताने कालची कारवाई करताना त्याला ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलं ते योग्य आहे, असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं. अशावेळी संकुचित वृत्ती ठेवणं योग्य नाही. आज आपण एकत्र राहूया असे आवाहनही त्यांनी केलं. जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअर फोर्सने ठेवायला आहे. भारताची भूमिका आक्रमक नव्हती. आता संबंध देशाने सावध राहून सरकारला सहकार्य कराव लागेल, असं पवार म्हणाले.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.