AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 24 तास धोक्याचे, 50 किमी प्रति तास वेगाने येतेय संकट, 4 राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. ज्यामुळे पुढील काही तास मुसळधार पाऊस काही राज्यात होण्याची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर जोरदार वारे देखील वाहणार आहे.

पुढील 24 तास धोक्याचे, 50 किमी प्रति तास वेगाने येतेय संकट, 4 राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा..
Rain
| Updated on: Jan 12, 2026 | 7:31 AM
Share

कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात बघायला मिळतंय. गेल्या काही दिवपांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. राज्यात तापमानात सातत्याने चढउतार बघायला मिळतोय. तापमान अचानक खाली जात आहे तर कधी वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहिल. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे थंडी कमी झाली आणि तापमान वाढले. उत्तरेकडील राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. पारा सातत्याने खाली जात आहे. उत्तरेकडील वाढलेली थंडी बघता राज्यातही थंडीची लाट येऊ शकते. आज अनेक भागात ढगाळ वातावरण राहिले. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचाही अंदाज आहे. दुपारनंतर अनेक भागात सध्या ढगाळ वातावरण दिसतंय. थंडीसोबत वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे.

हवामान विभागाने 12 जानेवारीसाठी एक मोठा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 4 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 50 किमी प्रति तास वेगाचे जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. उत्तर भारतातील 17 शहरांसाठी थंडीच्या लाटेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि कर्नाटकसाठी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा जारी हवामान विभागाने दिला.

पुढील दोन दिवसात पुणे शहरातील थंडी ओसरणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. त्यामुळे हुडहुडी कायम आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवसात हवामानात बदल होणार असून किमान तापमान वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरामध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, पुणे, मालेगावर भंडारा, नाशिक, गोदिंया येथे 10 अंश सेल्सिअस तापमान जळपास होते. थंडीची लाट राज्यातील काही भागात तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.