AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नुसता ताव मारायचा, इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात चमचमीत जेवण… मोती पाक बर्फी, डाळ भात, आणि… मेन्यू समोर, Video पाहून म्हणाल…

रामकृष्ण हरी म्हणत ताव मारा हो महाराज... इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात चमचमीत जेवण... मोती पाक बर्फी, डाळ भात, आणि... मेन्यू समोर, Video पाहून म्हणाल...

आता नुसता ताव मारायचा, इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात चमचमीत जेवण... मोती पाक बर्फी, डाळ भात, आणि... मेन्यू समोर, Video पाहून म्हणाल...
Indurikar Maharaj
| Updated on: May 03, 2026 | 1:14 PM
Share

Indurikar Maharaj: प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचं नाव ज्ञानेश्वरी असं आहे. ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली. आता ज्ञानेश्वरी हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 3 मे रोजी ज्ञानेश्वरी तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे… इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा संपूर्ण राज्यात होत असून, ‘शाही मेन्यू’ देखील समोर आला आहे.. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे.. या शाही विवाहसोहळ्यासाठी महाराष्ट्रीयन शाकाहरी पदार्थांची मेजवानी असणार आहे. सांगायचं झालं तर, इन्स्टाग्रामवर यश नागरे याने पोस्ट केलेल्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मेन्यूमधील पदार्थ…

इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नाच्या लग्नात पारंपरिक पदार्थ असणार आहेत, ज्यामध्ये मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, चपाती, डाळ भात, पुरी, मटकी या पदार्थांचा समावेश आहे. तर ही माहिती मुख्य आचाऱ्याने दिलेली आहे. सांगायचं झालं तर, संगमनेर तालुक्यातील कगुंजाळवाडी येथे 3 मे रोजी संध्याकाळी 6.30 मिनिटांनी इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

लग्नासाठी 100 एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. लग्नात लाखो पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किर्तनपुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे. गेल्यावर्षी इंदुरीकर महाराज यांनी मुलीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला होता. पण लोकांना लग्न साधे पद्धतीत करा सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात केल्याने त्यांच्यावर अनेकांनी टीका केलेली.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. एवढंच नाही तर, विविध संत-महंतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आता सर्वांच लक्ष या शाही विवाह सोहळ्याकडे लागलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी