Corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवा; ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश

कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांची अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्तानी अधिकाऱ्यांना दिल्या. (Corona second wave Commissioner)

Corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवा; ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 10:15 PM

ठाणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली. (instruction of Municipal Commissioner to administration on Corona second wave)

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्स अद्ययावत ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड

पालिका प्रशासनाकडून रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजन बेड, अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच, शहरात विनामास्क फिरणारे सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढचे 10 दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

तसेच शहरातील साफसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष न करता प्रभाग समितीनिहाय दररोज परिसर साफसफाई, रस्ते, सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करुन घेण्याच्या सूचनाही सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण करा

दरम्यान, राज्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने शाळेतील 70 टक्के शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत. उर्वरित चाचण्यादेखील तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

जगात कोरोना लशीवर काम सुरु आहे. लवकरच लस सामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार, काळात काळात लसीकरण करण्यासाठी संपूर्ण आरोग्य सेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. या आढावा बैठकीस ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.  (instruction of Municipal Commissioner to administration on Corona second wave)

संबंधित बातम्या :

थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, ‘AIIMS’ संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती

कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

कोरोना लसीच्या बातमीनं सोने दरात घसरण, 5 दिवसांत सोने किती रुपयांनी घसरलं?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.