पुण्यात भरले इंटरनॅशनल पेन फेस्टीवल ; 5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन पाहण्याची संधी

आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत.

पुण्यात भरले इंटरनॅशनल पेन फेस्टीवल ; 5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन पाहण्याची संधी
pen festival
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 7:03 PM

पुणे –  तब्बल 6 लाखांचा 18 कॅरट गोल्डपासून बनविलेला 5 तोळ्यांचा चमचमचा बाॅलपेन. दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेन.जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनविलेला अडीच लाखांचा पेन. जॅपनिज झाडांपासून बनविलेला आणि सोने तसेच प्लॅटीनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेन. सोन्याची निब असलेला दीड लाखांचा डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुंगधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई यासासारखे दुर्मिळ पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांनी उपलब्ध झाली आहे . शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे या ‘इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे’ आयोजन करण्यात आले आहे. व्हिनस ट्रेडर्सतर्फे या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

इतक्या प्रकारचे पेन पाहण्याची संधी

पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हर्दे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टीवलमध्ये 200 रुपयापासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध 500  श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये आहेत.

पेन वापरला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शन

आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत. उद्या दि 12 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा फेस्टीवल सुरु असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.  फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्युरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

Narayan Rane Live | संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? : नारायण राणे

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बनले हिंदूंच्या आस्थेचा चेहरा, कोणत्या मंदिरांच्या निर्माण कार्यात मोदींचं मोठं योगदान?

नाना पटोलेंबाबतच्या ‘त्या’ व्हायरल मेसेजने खळबळ, कारवाई करा अन्यथा उपोषण करू; माजी नगरसेवकाचा इशारा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.