International Women’s Day 2021 | पतीचा अकस्मात मृत्यू, एका आईचा मुलाला जगवण्यासाठी संघर्ष, पाहा VIDEO!

महिलेचा मुलाला जगवण्यासाठी आठ वर्षाचा संघर्षमय लढा सुरू आहे. (International Women’s Day 2021 Muktainagar struggle of a mother)

International Women’s Day 2021 | पतीचा अकस्मात मृत्यू, एका आईचा मुलाला जगवण्यासाठी संघर्ष, पाहा VIDEO!

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त एका आईची मुलाला जगवण्यासाठी संघर्षमय व्यथा सुरु आहे. अत्यंत दुर्बल परिस्थितीत ही महिला पोटाची खळगी भरत आहे. पतीच्या आकस्मात मृत्यूनंतरही त्या महिलेचा मुलाला जगवण्यासाठी आठ वर्षाचा संघर्षमय लढा सुरू आहे. (International Women’s Day 2021 Muktainagar struggle of a mother to keep her child alive)

जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव आहे. या गावात सीमा मराठे ही महिला राहते. या महिलेला ओम नावाचा एक मुलगा आहे. ही महिला पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करते.  काही वर्षांपूर्वी या महिलेचे लग्न झाले. लग्नानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र तो मुलगा अडीच वर्षाचा खेळता खेळता स्टूलवरुन पडला. त्यानंतर त्याला चिकन पॉक्स नावाच्या आजाराने ग्रासले.

या महिलेची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यातच गेल्या 5 वर्षापासून हतबल झाली आहे. त्या मुलाच्या उपचारार्थ त्या महिलेला मदतीची अपेक्षा आहे. समाजाकडून काहीतरी मदत मिळेल या आशेवर ती महिला जीवन जगत आहे.

पण आजच्या युगात ज्याचं त्याला घेणेदेणे राहिलं नाही. अशा परिस्थितीत आज सात ते आठ वर्षाच्या मुलाला घेऊन ही महिला जगत आहे. विशेष म्हणजेच अत्यंत दुर्बल पत्राच्या शेडमध्ये परिस्थितीत तोंड देत आहे. पती गेल्यावर आईचा आशेचा किरण मुलाकडे असतो. मात्र या महिलेचे तेही सुख नियतीने हिरावून घेतले आहे. त्या मुलाच्या उपचाराच्या मदतीसाठी ही महिला मोठ्या प्रमाणात धडपड करत आहे.

या महिलेने जागतिक महिला दिनानिमित्त इतर महिलांना अनेक उपदेश संदेश दिला आहे. व्यसनमुक्ती, आत्महत्या कोणतेही दुःख आलं तरी हिंमत ठेवा, असा प्रेरणादायी संदेश त्या महिलेने दिला आहे.  (International Women’s Day 2021 Muktainagar struggle of a mother to keep her child alive)

संबंधित बातम्या : 

International Women’s Day 2021 | महिला दिनाचा उत्साह, सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

Happy Women’s Day Wishes in Marathi: Video: महिला दिनाच्या दिवशी जर एक व्हिडीओ पाहायचा ठरवला तर कोणता निवडाल? आमच्या दृष्टीनं तो हाच !

Published On - 1:32 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI