AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्रजी योगीच आहेत… देवाभाऊंच्या फिटनेसवर काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योगासने केली, तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत कार्यक्रम आयोजित केला. या सर्व कार्यक्रमांनी योगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे अधोरेखित केले. फडणवीस यांच्या योगाबद्दलच्या विचारांचीही चर्चा रंगली.

देवेंद्रजी योगीच आहेत... देवाभाऊंच्या फिटनेसवर काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
amruta fdanvis Image Credit source: social media
Updated on: Jun 21, 2025 | 10:48 AM
Share

आज संपूर्ण भारतासह जगभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून त्यानिमित्ताने देशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणकेऱ्यांसह मिळून योगासनं केली. तर अमृता फडणवीस यांनी मुंबईत योग दिवस साजार केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

देवेंद्रजी योगीच आहेत पण … अमृता फडणवीस यांचं विधान काय ?

‘देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात’ अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिली. आज 11 वा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्यांसोबत योग दिवस साजरा करत आहोत, असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्याची पुण्यात वारकऱ्यांसोबत योगासनं

जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकरांसह योगासनं केली. आम्ही आज वारकऱ्यांसह योगासनं केली, पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला. प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणगावमध्ये योग शिबिर  

महाराष्ट्रातही विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. माणगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका प्रशासन आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी शिबिरात सहभागी होत विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत उपस्थितांना प्रेरणा दिली. या प्रसंगी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारीही उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.