ATS प्रमुख जयजीत सिंग यांच्या बदलीची चिन्हं, ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्तीची शक्यता

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास जयजीत सिंग यांच्या नेतृत्वात दहशतवाद विरोधी पथक करत आहे. (Jaijeet Singh may become Thane Police Commissioner)

ATS प्रमुख जयजीत सिंग यांच्या बदलीची चिन्हं, ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्तीची शक्यता
जयजीत सिंग
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 7:38 AM

मुंबई : ठाणे पोलीस आयुक्तपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान ATS प्रमुख आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी जयजीत सिंग (IPS Jaijeet Singh) यांच्याकडे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. उद्योगपती मुकेश अंबानी अँटलिया स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुखपद सध्या जयजीत सिंग सांभाळत आहेत. (IPS officer ATS Chief Jaijeet Singh likely to become Thane Police Commissioner)

फणसाळकरांच्या बढतीनंतर ठाण्याची धुरा कोणाला?

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना काही दिवसांपूर्वी पदोन्नती मिळाली. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार, यासंदर्भात अनेक नावं चर्चेत आहेत. मात्र सध्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल एटीएसचे नवे महासंचालक होण्याची चिन्हं आहेत.

अँटलिया स्फोटक प्रकरणाचा तपास

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास जयजीत सिंग यांच्या नेतृत्वात दहशतवाद विरोधी पथक करत आहे. ते 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ऑक्टोबर 2020 मध्येच त्यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर तत्कालीन एटीएस चीफ देवेन भारती यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

कोण आहेत जयजीत सिंग?

जयजीत सिंग 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी जयजीत सिंग यांच्याकडे ऑक्टोबर 2020 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली त्याआधी मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक (ADGP) म्हणून काम पाहिले (IPS officer ATS Chief Jaijeet Singh likely to become Thane Police Commissioner)

26 पोलीस निरीक्षकांना बढती

दरम्यान, कालच राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/उपविभागीय अधिकारीपदी बढती देण्यात आली. कोरोना संकटातही पोलीस दिवसरात्र काम करत असून, त्यांच्यावरही प्रचंड ताण आहे. त्याची बक्षिसी म्हणून पोलीस निरीक्षकांची पदोन्नती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, एका क्लिकवर संपूर्ण यादी

(IPS officer ATS Chief Jaijeet Singh likely to become Thane Police Commissioner)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.