AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भपात कर…, नवऱ्याने सांगून सुद्धा बायकोने दिला अंध मुलाला जन्म, त्यानंतर साडेतीन वर्षांत भयानक अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह

गर्भपात कर... असं नवऱ्याने बायकोला अनेकदा सांगितलं, पण तरी देखील तिने अंध मुलाला जन्म दिला. अखेर मुलाच्या जन्माच्या साडेतीन वर्षांनंतर असं काही घडलं, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली. कारण चिमुकल्याचा मृतदेह विहरीत आढळला...

गर्भपात कर..., नवऱ्याने सांगून सुद्धा बायकोने दिला अंध मुलाला जन्म, त्यानंतर साडेतीन वर्षांत भयानक अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह
Jalgaon Crime
| Updated on: Jul 14, 2026 | 12:57 PM
Share

आपलं कुटुंब आनंदी आणि निरोगी असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण काही काय होईल सांगता येत नाही. असंच काही जळगाव येथील यावल तालुक्यातील किनगाव याठिकाणी घडलं आहे. अंध नवऱ्याने आईसोबत एक मोठा कट रचन 70 टक्के अंध बायको आणि अंध मुलाला विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, विहिरीतील एका लाकडी दांड्याचा आधार घेत महिलेने स्वतःचे प्राण वाचवले आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पती आणि सासू विरोधात पोलीस स्थानकात खून आणि खूनाचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं असून, पोलीस चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगान येथील विहिरीत एक महिला आणि मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुरुवातील हा कोणता घातपात नसून, अपघात आहे… असं सर्वांना वाटलं, पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली, तेव्हा धक्कादायक घटना समोर आली.

मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. तेव्हा महिलेने धक्कादायक माहिती दिली. शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेलेल्या सासूने आणि पतीने विहीरीत ढकलल्याचा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, महिला गर्भवती असताना वैद्यकीय तपासात असं समोर आलेलं की, बाळ अंध आहे… त्यामुळे पतीने महिलेला गर्भपात करण्यास सांगितलं होतं. पण तरी देखील महिलेने मुलाला जन्म दिला.

अंध मुलाच्या जन्मानंतर पती – पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले. याच कारणामुळे दोघांमधील भांडणं टोकाला गेली आणि गंभीर घटना घडली.. असं संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून पती स्वप्नील भागवत पाटील आणि सासू आशाबाई भागवत पाटील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Follow Us
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ