एका पत्राने 6 फुटीरांचं टेन्शन वाढलं; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात अखेरचा डाव टाकला
uddhav thackeay news : उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांचं टेन्शन वाढवलं आहे. त्याच्या एका पत्राने शिंदे गटाचे टेन्शन वाढवलं आहे.

उद्धव ठाकरेंना मागील 3 वर्षांपासून अनेक राजकीय संघर्षांना सामोरे जावे लागत आहे. ठाकरेंना 2022 साली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. पुढे काही खासदारांनीही साथ सोडली. ठाकरे 3 वर्षानंतर पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी पुन्हा आमदार आणि खासदार निवडून आणले. परंतु अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 6 खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. 6 फुटीरांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे पुन्हा पेचात सापडले. 6 खासदारांनी शिंदे गटात गेल्याचे जाहीर केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लेटरबॉम्ब टाकला आहे. ठाकरे गटाने फुटीर खासदारांना पत्र धाडत शिंदे गटाचे टेन्शन वाढवलं आहे.
ठाकरे गटाने फुटीर खासदारांना एक महत्वपूर्ण पत्र पाठवलं आहे. फुटीरांना कायदेशीररित्या शिंदे गटात विलीन होता येणार नाही, असा उल्लेख ठाकरे गटाच्या पत्रात दिसत आहे. त्याचबरोबर घटनेच्या 10 व्या कलमानुसार मूळ पक्षाची मान्यता मिळल्याशिवाय हे शिंदेसेनेतील विलीनीकरण शक्य नाही, असं ठाकरे गटाचा दावा आहे. पुढील कायदेशीर लढाईत हे पत्र अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे ठाकरे गटाच्या पत्रात? महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात
ठाकरे गटाने फुटीर खासदारांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं की, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय पक्षात विलीन झाल्याचं समजलं. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन झाल्यचं चित्र निर्माण केलं जात आहे. परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मूळ पक्ष म्हणून विलीनिकरणाला मान्यता दिलेली नाही. विशेष म्हणजे तुम्हाला घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कोणत्याही पक्षात विलीन होता येणार नाही.
तत्पूर्वी, ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर संसदीय पक्षाने गटनेते अरविंद सावंत यांनी फुटीर खासदारांना दुसरं पत्र पाठवलं आहे. दुसऱ्या पत्रातून फुटीर खासदारांना कोणत्याही पक्षात विलीन होता येणार नाही, असे स्पष्ट केलं. तुम्हाला कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा गटनेते अरविंद सावंत यांनी मांडलाय. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटासमोर कायदेशीर पेच निर्माण केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पत्राला एकनाथ शिंदेंच्या त्या 6 खासदारांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.
