AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-वडिलांमागून दोन्ही मुलांचा मृत्यू, 17 दिवसात चौघांचा अंत, सुनांवर आभाळ कोसळलं

मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेला (Jalgaon Family Dies of COVID )

आई-वडिलांमागून दोन्ही मुलांचा मृत्यू, 17 दिवसात चौघांचा अंत, सुनांवर आभाळ कोसळलं
येवले कुटुंबातील चौघांचा कोरोना सदृश आजाराने बळी
| Updated on: May 06, 2021 | 12:18 PM
Share

जळगाव : कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अवघ्या सतरा दिवसात अंत झाला. पाच-पाच दिवसांच्या अंतराने येवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येवलेंच्या घराजवळील काही शेजारी कुटुंबांनी कोरोनाच्या धास्तीने थेट जंगलातच संसार थाटला आहे. (Jalgaon Muktainagar Yeole Family Dies of COVID like disease within 17 Days)

कोरोनाचा कहर काही केल्या थांबता थांबेनासा झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा यात समावेश आहे. आधी आई-वडिलांवर काळाने घाला घातला, त्यानंतर धाकटा भाऊ गेला. तर अखेर मोठ्या भावाचाही जळगावच्या कोविड सेंटर गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला.

आई वडिलांची चिता शांत होईपर्यंत मुलं कालवश

काकोडा गावातील अहिल्याबाई होळकर नगरातील रत्नमाला येवले यांचा दिनांक 17 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती रमेश येवले यांचीही प्राणज्योत मालवली. आई वडिलांची चितेची आग शांत होत नाही, तोवर दोन्ही मुलांचाही दुर्दैवी अंत झाला. आधी रवींद्र येवले आणि नंतर मोठा मुलगा चंद्रकांत येवले याचाही पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला

घरचे पुरुषच गेल्याने महिलांवर जबाबदारी

दोन्ही मुलांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहेत. एका भावाला दोन मुले आणि एक मुलगी, तर दुसऱ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी. घरची जबाबदारी आता या दोन्ही महिलांवर आली आहे. मात्र या कोरोनाचा काळात दोन्ही महिला आपापल्या माहेरी मुलाबाळांना घेऊन निघून गेल्या आहेत. (Jalgaon Family Dies of COVID )

कष्टकरी कुटुंब म्हणून ओळख होती

एक मुलगा गाव खेड्यांमध्ये गोळ्या बिस्कीट विकत होता तर दुसरा मातकामाला जात होता. मेहनतीच्या बळावर यांनी कुटुंबाच्या विकासासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ही स्वप्नं त्यांच्या निधनाने विरुन गेली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कोरोनाचा खैरे कुटुंबावर घाला, आधी पत्नी, मग वकील कन्येचा मृत्यू, आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरेंचे निधन

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं

(Jalgaon Family Dies of COVID )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.