AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Nagar Parishad Election Result : मतमोजणीपूर्वीच भाजपचे पारडे जड, पाहा कोणाचे किती नगरसेवक बिनविरोध?

जळगाव जिल्हा नगरपरिषद निवडणुकीत भाजपची मोठी मुसंडी मारली आहे, यात १८ पैकी ९ नगराध्यक्ष पदांवर भाजपचे वर्चस्व मिळण्याची शक्यता असून २५ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Jalgaon Nagar Parishad Election Result : मतमोजणीपूर्वीच भाजपचे पारडे जड, पाहा कोणाचे किती नगरसेवक बिनविरोध?
bjp (1)
| Updated on: Dec 21, 2025 | 12:37 PM
Share

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आज जळगावातील १८ महत्त्वाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, मतमोजणीपूर्वीच भाजपने जळगाव जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या निवडणुकीत मतदानापूर्वीच अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात तब्बल २५ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बिनविरोध निवडींमध्ये भाजपचे वर्चस्व

जळगाव जिल्ह्यात झालेल्या बिनविरोध निवडींमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण २५ बिनविरोध नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. यात भाजपचे १८ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे ३ नगरसेवक, काँग्रेस १ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा १ नगरसेवक आणि इतर/अपक्ष: २ नगरसेवक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर नगरपरिषद निहाय विचार केल्यास, जामनेर आणि भुसावळमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. जामनेरमध्ये भाजपचे ९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. भुसावळमध्ये भाजपचे ४ नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. फैजपूरमध्ये भाजप ३, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) १ अशा एकूण ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

अपक्षांचीही बाजी

त्यासोबतच सावदामध्ये शिवसेना शिंदे गटाचे २ आणि भाजपचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. रावेर: भाजपचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. एरंडोल शिवसेना शिंदे गटाचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. तसेच शेंदुर्णी येथे एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. त्यासोबतच अमळनेर शहर विकास आघाडीचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील १८ नगराध्यक्ष पदांसाठी मोठी चुरस असून संभाव्य कलानुसार भाजप ९, शिवसेना ६ आणि राष्ट्रवादी १ अशा जागांवर आघाडी घेण्याची शक्यता आहे. विशेषतः नशिराबाद नगरपरिषदेचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर आज जाहीर होत असल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या जिल्ह्यात एकूण ५ लाख ७८ हजार मतदारांनी आपला कौल दिला असून, आज सायंकाळपर्यंत सर्व १८ नगरपालिकांचे अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहेत.

Follow Us
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी