जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली

किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. (Jalgaon Truck Accident Labors )

जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली
जळगाव ट्रक अपघात
अनिश बेंद्रे

|

Feb 15, 2021 | 11:02 AM

जळगाव : जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हेलावले आहेत. मराठीतून ट्वीट करत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. (Jalgaon Truck Accident kills 15 Labors PM Narendra Modi tweets)

पपई नेणारा ट्रक उलटला

रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

ट्रकखाली दबून मजुरांचा मृत्यू

अपघातात काही मजूर ट्रकखाली तर काही मजूर पपईखाली दबले गेले. यामध्ये 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे. सात पुरुष तर सहा महिलांचा आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

मयत मजुरांची नावं
1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार – वय 30 रा. फकीर वाडा रावेर
2) सरफराज कासम तडवी – वय 32 रा. केऱ्हाळा
3) नरेंद्र वामन वाघ – वय 25 रा. आभोडा
4) डिंगबर माधव सपकाळे – वय 55 रा. रावेर
5) दिलदार हुसेन तडवी – वय 20 रा. आभोडा
6) संदीप युवराज भालेराव – वय 25 रा. विवरा
7) अशोक जगन वाघ – वय 40 रा. आभोडा
8) दुर्गाबाई संदीप भालेराव – वय 20 रा. आभोडा
9) गणेश रमेश मोरे – वय 05 वर्ष रा. आभोडा
10) शारदा रमेश मोरे – वय 15 वर्ष रा. आभोडा
11) सागर अशोक वाघ – वय 03 वर्ष रा. आभोडा-
12) संगीता अशोक वाघ – वय 35 रा. आभोडा
13) सुमनबाई शालीक इंगळे – वय 45 रा. आभोडा
14) कमलाबाई रमेश मोरे – वय 45 रा. आभोडा
15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा. आभोडा

पंतप्रधान शोकाकुल

महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

जळगाव दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जखमी मजूरांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केली.


संबंधित बातम्या :

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

(Jalgaon Truck Accident kills 15 Labors PM Narendra Modi tweets)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें