AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न महागात, पुण्यातील कंपनीने लावला 23 कोटींचा चुना

पुण्याच्या टीडब्ल्यूजे असोसिएट्सने जळगावात शेअर मार्केटच्या नावाखाली २३ कोटी ८१ लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून, मुख्य एजंट मिलिंद पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संचालक सध्या पोलीस कोठडीत आहेत.

रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न महागात, पुण्यातील कंपनीने लावला 23 कोटींचा चुना
pune
| Updated on: May 15, 2026 | 11:06 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फसवणुकीच्या विविध घटना घडत आहेत. त्यातच आता जादा परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘टीडब्ल्यूजे (TWJ) असोसिएट्स प्रा. लि. पुणे’ या कंपनीच्या जळगावमधील कारभाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जळगावमधील २७९ गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी कंपनीच्या जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटील याला अटक केली आहे.

नेमके प्रकरण काय?

पुणे स्थित असलेल्या टीडब्ल्यूजे असोसिएट्स कंपनीने जळगाव शहरात आपली शाखा उघडून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणुकीचे जाळे विणले होते. आमच्या कंपनीत गुंतवणूक करा आणि घरबसल्या खात्रीशीर मोठा परतावा मिळवा, असे आमिष एजंटमार्फत नागरिकांना दाखवण्यात आले. सुरुवातीला काही जणांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा ओघ वाढला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना मुद्दल आणि परतावा मिळणे बंद झाले. तेव्हा फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.

राज्यभर पसरलेली फसवणुकीची पाळेमुळे

या कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांनी केवळ जळगावातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात फसवणुकीचे मोठे रॅकेट चालवले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० जानेवारी २०२६ रोजी मुख्य सूत्रधार समीर आणि नेहा नार्वेकर यांना अटक केली होती. सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या चौकशीतून राज्यातील इतर शहरांमधील फसवणुकीचे धागेदोरे हाती लागत आहेत. दरम्यान, जळगावातील गुन्ह्यात सहभागी असलेला स्थानिक मुख्य एजंट मिलिंद पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे आता जळगावमधील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांनी देखील पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल