AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची मुजोरी, ऑफिसमध्ये दारु पितो, वरुन म्हणतो, ‘जे करायचं ते कर’

अमळनेरच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत अग्निशमन दलाचा अधिकारी कार्यालयात दारु पित असताना दिसत आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी व्हिडीओ बनवणाऱ्याला तुला करायचं ते कर, असं आव्हानदेखील देताना दिसत आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची मुजोरी, ऑफिसमध्ये दारु पितो, वरुन म्हणतो, 'जे करायचं ते कर'
| Updated on: Feb 18, 2024 | 4:19 PM
Share

किशोर पाटील, Tv9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 18 फेब्रुवारी 2024 : कोणत्याही प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन कार्यालयातच मद्यपान करावं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सध्या अमळनेरमध्ये उपस्थित केला जातोय. याबाबत अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. काही जण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होत आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे ते कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे. आपातकालीन परिस्थितीत किंवा संकट काळात या कार्यालयाची अतिशय मौल्यवान अशी मदत होते. असं असताना संबंधित अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नसणं हे खरंच विशेष आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयातला अधिकारी दारू पित असल्याचा व्हिडीओ एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अमळनेर शहरातील परेश उदेवाल नामक तरुणाने काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ चित्रीत केल्याचं सांगितलं जातंय. हा प्रकार समोर आणल्यानंतर त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या मुजोर अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. म्हणून तक्रारदार परेश उदेवाल याने उपोषणाचा इशारा देखील दिलाय.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

परेश उदेवाल तरुण अग्निशमन दलाच्या कार्यालय परिसरात जातो. तो तिथे कार्यालयात मद्याचा पेला भरणाऱ्या एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडतो. तो संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. यावेळी अधिकारी जे करायचं ते कर, असं त्या तरुणाला उत्तर देतो. संबंधित व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. पण या व्हिडीओत तरुणाला जे दाखवायचं आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. अधिकारी काय करत आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी काही कारवाई होते का? किंवा इतर काय हालचाली घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.