AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanth Khadse on Devendra Fadnavis : युती तुटल्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; मी फक्त घोषणा करण्याचे काम केले; एकनाथ खडसेंचे पुन्हा फडणवीसांवर टीका

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते, त्यानंतर शिवसेना-भाजप हा वाद टोकाला गेला. या घटना घडत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी मात्र शिवसेना-भाजप (Shivsena BJP) युतीचा प्रश्नावर वक्तव्य करुन हा वाद पुन्हा एकदा उखरून काढला आहे.

Ekanth Khadse on Devendra Fadnavis : युती तुटल्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; मी फक्त घोषणा करण्याचे काम केले; एकनाथ खडसेंचे पुन्हा फडणवीसांवर टीका
| Updated on: Aug 22, 2022 | 7:18 AM
Share

जळगावः राज्यातील राजकारणात आता प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत, या भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वाद टोकाला जात असतानाच आणि आज अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी असताना राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) यांनी गंभीर गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. युतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळेच मागील वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपची (Shivsena-BJP) युती तोडण्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांचाच होता असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

युती तोडण्याचा निर्णय आधीच झालेला

युती तोडण्याचा निर्णय आधीच झालेला होता मी फक्त घोषणा करण्याचे काम आपण केले असंही एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमची नैसर्गिक युती होती, असं जाहीर वक्तव्य त्यांनी मविआ सरकार कोसळताना केले होते, मात्र आता एकनाथ खडसे यांच्या या विधानामुळे शिवसेना-भाजपमध्ये आणखी राजकीय युद्ध चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती तोडण्याचा निर्णय आधीच झालेला होता, आपण फक्त तशी घोषणा केली असल्याचेही राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

युती तोडण्याच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडवणीस

शिवसेना-भाजपची युती तोडण्याच्या महत्वाच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यामुळेच शिवसेना भाजपची युती तुटली होती. आणि या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांची होती.शिवसेना भाजप युती तुटल्यामुळेच त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असंही त्यांनी यावेळी सांगितले.

…तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते, त्यानंतर शिवसेना-भाजप हा वाद टोकाला गेला. या घटना घडत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मात्र शिवसेना-भाजप युतीचा प्रश्नावर वक्तव्य करुन हा वाद पुन्हा एकदा उखरून काढला आहे. शिवसेना-भाजप युतीविषयी बोलताना ते म्हणाले की. युती तोडण्याच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडवणीस हे मुख्य होते, आणि त्यावेळी युती तुटल्यामुळेच देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाले नाही तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता अशी प्रतिक्रियाही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.