AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil: उद्धव सेनेला पुन्हा मोठे भगदाड? आता इतके आमदार… गुलाबराव पाटील यांचा मोठा बॉम्ब

Gulbrao Patil on Operation Tiger: उद्धव ठाकरे सेना अद्याप सहा खासदारांच्या बंडाने पुरती सावरलेली नसतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. इतक्यावर थांबतील ते पाटील कसले, त्यांनी तर ठाकरे सेनेचे किती आमदार फुटणार याचा आकडाच सांगितला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Gulabrao Patil: उद्धव सेनेला पुन्हा मोठे भगदाड? आता इतके आमदार... गुलाबराव पाटील यांचा मोठा बॉम्ब
गुलाबराव पाटील, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 26, 2026 | 12:48 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : उद्धव ठाकरे सेनेतील 6 खासदारांनी बंडाचा झेंडा उभारला. हे खासदार शिंदे गोटात दाखलही झाले आहेत. त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या धक्क्यातून ठाकरे सेना पुरती सावरली नसतानाच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा बॉम्ब टाकला. इतक्यावर थांबतील ते पाटील कसले? त्यांनी चार पावलं समोर टाकली. त्यांनी उद्धव सेनेतील किती आमदार फुटतील (Gulbrao Patil on Operation Tiger) याचा आकडाच मांडला आहे. त्यांच्या या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुलाला जमत नाही म्हणून बापाने तरी केलं पाहिजे

उद्धव ठाकरे यांचे फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू होत आहेत. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टीका केली आहे. दौरे केलेच पाहिजे दौरे केल्याशिवाय काम होत नाही. मुलाला जमत नाही म्हणून बापाने तरी केलं पाहिजे. या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचे उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

फिरणारे नेते म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे लोकांच्या मनात आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या शेतकऱ्यांच्या , वारकऱ्यांच्या तसेच सर्वांच्या मनात आहे, असे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.

आरशाला दगड मारू नये

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. असं व्हायला नको पाहिजे होतं. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे आरशाला दगड मारू नये. वाद विवाद होतात मात्र याचा अर्थ असा नाही शिवीगाळ करणे आणि मारणे. ते आमचे बंधू आहेत यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी त्यांना सांगेल. सॉरी म्हणायला पाहिजे त्याला काय हरकत आहे, असे त्यांनी कान टोचले.

14 हून अधिक आमदार फुटणार

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऑपरेशन टायगर 3.0 वर मोठे भाष्य केले आहे. खासदारानंतर आता आमदार फुटणार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. झालंय झालंय. तसेच होईल लवकरच होईल. थोडं थांबा, 14 आमदार नाही जास्तीत जास्त आमदार येतील. एकनाथ शिंदे हे बोलत नाही फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा शिंदे साहेब दाढीवर हात फिरवतात तेव्हा टायगर सक्सेस होतो.आणि हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी देखील स्वतः कबूल केलेला आहे. आता ठाकरेंचे आमदार देखील शिवसेनेत येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटली यांनी संकेत दिले आहे.

आधी आवाज तर सुधरवा राजा

ऑपरेशन 3.0 वरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केली. आधी आवाज तर सुधरव राजा, गुलाबराव पाटलांसारखा आवाज लागतो त्यासाठी असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. ठाकरेंनी दान केलेल्या चांदीच्या विटा गायब असल्याच्या वृत्तावर त्यांनी मत व्यक्त केलं.एवढा मोठा विषय मला माहिती नाही की कोणी काही दान केलं. पण चौकशा होत आहेत. मला विशेष माहित नाही त्यामुळे त्यावर बोलणं उचित नाही, असे ते म्हणाले.

आता कोण कोणाचा फोटो कधी बदलतो याची गॅरंटी आहे का?

गल्लीचे राजकारण आहे. तिघही संजय नावाचे व्यक्ती हिट लिस्टवर आहेत. त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये असा सल्ला देणारा एवढा मोठा नेता मी नाहीये. मात्र समाज माध्यम नाराज होईल अशी कृती माझ्यासकट कोणी करू नये. सहा खासदार सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोटो वापरून निवडून आले. आता कोण कोणाचा फोटो कधी बदलतो याची गॅरंटी आहे का? काँग्रेस गॅरंटी नाही सध्या तर बाकीच्यांचं काही बोलायची गरज नाही सध्या असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?