Bus Accident | इंदोर अमळनेर बस अपघात, 55 प्रवासी, 13 मृत्यूमुखी, 8 मृतांच्या नावांची यादी

Indor Amalner Jalgaon Bus Accident | इंदोरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासनातर्फे बचाव कार्य सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे

Bus Accident | इंदोर अमळनेर बस अपघात, 55 प्रवासी, 13 मृत्यूमुखी, 8 मृतांच्या नावांची यादी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 2:10 PM

जळगावः इंदोरहून अमळनेरला येणाऱ्या बस अपघातात अद्याप 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील धार इथं बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुलावरून ही बस थेट नर्मदा नदीत कोसळली. बसमध्ये जवळपास 55 प्रवासी होते. जळगाव जिल्हा आणि धार येथील स्थानिक प्रशासनातर्फे बसमधील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक जण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे. बस नदीत कोसळल्यानंतर काही जण पोहत नदीच्या किनारी आले तर काहीजण खडकांचा आधार घेत तिथेच थांबून राहिले. प्रशासनातर्फे या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

13 पैकी 08 मृतांची नावे पुढील प्रमाणे-

(टीप- मृतांच्या नावांची यादी प्राथमिक माहितीनुसार देण्यात आली आहे. मृतांच्या सामानातील आधार कार्डावरून काही नावे देण्यात आली आहेत. लवकरच पुढील नावांची खात्री होईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.)

  1.  राम गोपाल जांगीड, नांगल कला, गोविंदगढ़ जयपूर, राजस्थान
  2.  हेमराज जोशी, वय 70 वर्ष, मल्हारगढ़ उदयपूर, राजस्थान
  3.  श्रवण चौधरी, वय 40 वर्षे,शारदा कॉलनी अमळनेर, जळगाव
  4. आनंदा पाटील, वय 60, पिळोदा अमळनेर
  5. निबाजी पाटील, वय 55 वर्षे, पिळोदा, अमळनेर
  6. एकनाथ पाटील, वय 45 वर्षे, अमळनेर (वरील 1 से 6 पर्यंतच्या मृतांची ओळख आधार कार्डव्दारे केलेली आहे)
  7.  मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे, मूर्तिजापुर अकोला (नातेवाईकांनी ओळख पटवली)
  8. अब्बास, नूरानी नगर, (इंदूर नातेवाईकांकडून ओळख पटलेली आहे)
  9. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक)
  10.  प्रकाश श्रावण चौधरी (वाहक)

मदतीसाठी इथे करा संपर्क

– जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 – घटनास्थळी मदतीसाठी – 09555899091. -एसटी महामंडळाचा संपर्कक्रमांक 022/23023940

कोणत्या बसला अपघात?

Bus No MH40N9848 चालक- चंद्रकांत एकनाथ पाटील 18603 वाहक – प्रकाश श्रावण चौधरी 8755 मार्ग – इंदोर – अमळनेर इंदोर हून सुटण्याची वेळ – 7:30 अपघाताचे ठिकाण – खलघाट अणि ठीगरी मध्ये नर्मदा पुलावर

कशी घडली घटना?

बस नदीत कोसळल्यानंतर 15 ते 20 जण वाहून गेल्याचं सांगितलं जातंय. तर काहीजण पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचले. काहींना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या बसमध्ये जवळपास 55 प्रवासी होते. अजूनही दरीत कोसळलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रेलिंग ओलांडताना ही दुर्घटना घडली. पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली. या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले. यात बसचा चक्काचूर झाला. अपघातातून बचावलेले प्रवासी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होते. तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले. या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल. तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.