नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्या शासन आपल्या दारी यामध्ये सुटतील का?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांनाच सवाल

आजही जनतेला रेशन मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, जिल्ह्यातल्या निम्म्यापेक्षा जागा शासकीय कार्यालयातल्या रिक्त आहेत. तरीही शासन आपल्या योजना राबवत असल्याचा विनाकारण गवगवा करत असल्याचा ठपकाही विरोधकांनी ठेवला आहे.

नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्या शासन आपल्या दारी यामध्ये सुटतील का?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांनाच सवाल
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 4:44 PM

जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना-भाजप सरकार जनसामान्यांचे कसे आहे हे दाखवण्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे शासन आपल्या दारी. या कार्यक्रमाच्या निमित्तान सरकार आपल्या योजना, त्या लोकापर्यंत कशा पोहचल्या आहेत, त्याचा फायदा कोणाला झाला आहे यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही जनतेची भेटीगाठी घेऊन नागरिकांकडेच शासन जात आहे. मात्र यावरही विरोधकांकडून आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

आता मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 27 रोजी जळगाव दौरा करत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदेश जनतेला मिळतच नाही

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे 27 तारखेला जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकाच ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी मात्र प्रत्यक्षात योजना कोणते आणि त्याबाबत आदेश जनतेला मिळतच नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

कायदा सुव्यवस्थेचा बोजवा

एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, आजही जनतेला रेशन मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, जिल्ह्यातल्या निम्म्यापेक्षा जागा शासकीय कार्यालयातल्या रिक्त आहेत. तसेच केळीच्या बागांच्या झालेले नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा बोजवाराही उडालेला आहे. तर कापसाला योग्य भाव मिळालेला नाही.

अनेक लोकांच्या अनेक समस्या

शेतकऱ्यांना बियाणे मिळालेली नाहीत, त्याच बरोबर पाण्याची भीषण टंचाईही अनेक ठिकाणी जाणवत आहे. तर दुसरीकडे स्वतः राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात पाण्यासाठी लोक मोर्चा काढत आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, वेगवेगळे विषय आहेत ते विषय शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सुटतील का? असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आधी निर्णय घ्यावा

त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा दौरा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी निर्णय घ्यावा असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. फक्त आमच्या योजना अशा आहेत, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात काय अंमलबजावणी झाली याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.