Gold Rate : सोन्याची गरुड भरारी, तर चांदी ही लकाकली, पहिल्यांदाच जीएसटीविना गाठला लाखांचा टप्पा, ग्राहक कावरे-बावरे
Jalgaon Gold And Silver Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने आज विक्रमी झेप घेतली. सोन्याने पहिल्यांदाच जीएसटीविना लाखांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने आज विक्रमी झेप घेतली. सोन्याच्या दरात २४ तासात १४०० रुपयांनी वाढ झाली असून पहिल्यांदाच सोने विना जीएसटी १ लाखांवर पोहोचले आहेत. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीस १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दोन्ही धातुंच्या हनुमान उडीमुळे दिवाळीपर्यंत सोने-चांदी सव्वा लाखांचा टप्पा गाठण्याची भीती व्यक्त होत आहे.
विना जीएसटी सोने लाखावर
गेल्या २४ तासात सोने बेफाम पळाले. सोने प्रति १० ग्रॅम १४०० रुपयांनी वधारले. सोने पहिल्यांदाच जीएसटी दरा व्यतिरिक्त १ लाखांवर पोहचले. तर चांदीचे दराने सुद्धा विक्रमी उच्चांकी गाठली असून इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १८ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबल्यास दोन्ही धातुच्या किंमती कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ग्राहकांना झाला फायदा
काही महिन्यापूर्वी कमी दरात सोन खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. सोन्या आणि चांदीच्या दराचा ग्राहकांवर सुद्धा मोठा परिणाम झाला असून ग्राहकांमध्ये वाढत्या दरामुळे कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे. काही ग्राहक कमी दरात ठोक सोने-चांदी खरेदी करून भाव वधारल्यावर ते विक्री करत असल्याचेही समोर येत आहे. त्यातून त्यांना अवघ्या काही महिन्यात मोठा फायदा होत आहे.
सर्व देशांवर नव्याने जे टेरीफ रेट लागू झाले आहे, जगतील काही देशांमधील अस्थिरतेचा देखील सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. दर गगनाला भिडल्यामुळे सोन्या आणि चांदीच्या खरेदीपेक्षा दागिन्यांची मोड करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
