AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : ‘…तर मी रस्त्यावर उतरणार’, एकनाथ खडसे यांचा मोठा इशारा

Narpar-Girna river linking project : एकनाथ खडसे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पासाठी उत्तर महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने नुकतंच गिरणा खोऱ्यात 10.64 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अजूनही खान्देशात आंदोलने होत आहेत. याचबाबत खडसे यांना महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना खडसेंनी आपणही नार-पारच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला.

Eknath Khadse : '...तर मी रस्त्यावर उतरणार', एकनाथ खडसे यांचा मोठा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे
| Updated on: Sep 03, 2024 | 5:09 PM
Share

महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांबाबत विस्तृत माहिती दिली. एकनाथ खडसे यांनी जलसिंचनासाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढत राज्यभरात अनेक धरण, बॅरेज बांधले. खडसे यांनी या मुलाखतीत त्यांनी केलेली कामे, ती कितपत यशस्वी झाली आणि जी कामे अर्धवट राहिली याबाबत सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ खडसे यांनी नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पावरही भूमिका मांडली.

राज्य सरकारने 10 टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात टाकण्याबाबतचा निर्णय घेतला. तसेच त्यासाठी निधीची देखील घोषणा केली. पण उत्तर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात असलं तरी काही सामाजिक संघटना, राजकीय नेते 10 टीएमसी पेक्षा जास्त पाण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी अनेक संघटना आंदोलनही करत आहेत. आंदोलकांची ही मागणी रास्त असल्याचं मत खडसेंनी व्यक्त केलं. 10 टीएमसी पाण्याने काहीच होणार नाही, असं स्पष्ट मत खडसेंनी व्यक्त केलं. त्यामुळे एकनाथ खडसे यांना या प्रकल्पासाठी आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खडसेंनी परखडपणे भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

“पाण्यासाठी कुणाचाही प्रामाणिक प्रयत्न असेल, मग तो कुणाचाही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, कोणत्याही विचाराचा माणूस असेल, पण पाण्यासाठी संघर्ष करत असेल तर मी त्याच्या पाठिशी उभा आहे. त्यांच्यासोबत मी केव्हाही संघर्ष करायला तयार आहे. पाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी हे जीवन आहे आणि माझं जीवन पाण्यासाठी थेंब थेंब तुटतं. तसं मी पाठिशी राहील. त्यासाठी मी रस्त्यावर उतरायला, भांडायला काहीच अडचण नाही. नारपारचं पाणी हे आमच्या हक्काचं पाणी आहे. ते आम्हाला मिळालंच पाहिजे. त्यासाठी लढायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

नार-पार प्रकल्प नेमका काय आहे?

“नार-पार प्रकल्प हा फार मोठा प्रकल्प आहे. नार-पार प्रकल्पाची कल्पना ही फार जुनी आहे. पण नव्याने ज्यावेळेस युती सरकार आलं त्यावेळेस मी पाठबंधार मंत्री झालो. त्यावेळेस आम्ही गोदावरी सिंचन महामंडळाची स्थापना केली. इकडे तापी सिंचन महामंडळ स्थापन केलं. त्या कालखंडात तापीच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रुढावी असा आमचा प्रयत्न होता”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

“नार-पारचा विषय असा विषय होता की, तिथे सहा नद्या आहेत. त्या सहा नद्यांवर धरणं बांधून त्यातलं उरलेलं पाणी चणकापूर धरणात आणून, चणकापूर धरण हे त्या धरणाचं मूळ आहे. तिथून ते पाणी गिरणा नदीत टाकायचं. तिथे काही नद्या होत्या, अंबिका, दमनगंगा अशा स्वरुपाच्या आजही सहा नद्या आहेत. या सहा नद्यांचं पाणी आजही अरबी समुद्रात जावून मिळतं. अरबी समुद्राला जावून मिळणारं पाणी अडवलं पाहिजे अशी सर्वांची कल्पना होती”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

“दमनगंगा खोरे आणि अंबिका खोरे, अशा सहाही नद्यांच्या ठिकाणी धरणं बांधण्यासाठी त्या भागात ज्या टेकड्या वगैरे आहेत, त्यामुळे ते काम खर्चिक आहे, पण पाणी साठवू शकतो अशी स्थिती आहे, असं सर्वेक्षण आमच्यासमोर आलं होतं. नंतर ते पाणी गिरणा धरणात टाकून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा एवढ्या तालुक्यांना त्याचा लाभ व्हावा, आधी त्याचा लाभ गिरणा धरणाला होता, गिरणा धरण हे 50 टक्के डिपेन्डिबल आहे. हे धरण फक्त 50 टक्के भरेल असं आहे, ती 50 टक्के तूट आहे. ती तूट भरुन काढण्यासाठी नार-पार प्रकल्पाचं पाणी त्यात टाकलं पाहिजे. यामुळे ते धरण शंभर टक्के भरेल. त्यामुळे जळगाव जिल्हातील सर्व तालुक्यांना पाणी मिळेल”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

“जळगावातील सहा ते सात तालुके बागायत होतील. खरंतर ते बागायतदार होते. पण गिरणा धरणावर अनेक धरणं जसं की, चणकापूर सारखी धरणे बांधल्यामुळे खान्देशाला पाणी मिळत नाही. पण ठिक आहे, नार-पार प्रकल्पाचं पाणी आल्याने गिरणा धरणात शंभर टक्के पाणी होईल आणि खान्देशवासीयांना त्याचा फार मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.