शिंदे गटाच्या मंत्र्याच्या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो; सोशल मीडियावर केले जाते ट्रोल

आतापर्यंत शिंदे गटाच्या नेत्यांच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचे फोटो नव्हते. मात्र निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर फडणवीस यांचा फोटो आल्याने त्याला नेटिझन्सकडून आक्षेप घेण्यात येत आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्याच्या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो; सोशल मीडियावर केले जाते ट्रोल
गुलाबराव पाटील Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 3:37 PM

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या फेसबूकपेजवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टरवर फडणवीस यांचा फोटो आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या फेसबूक पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या विविध पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असल्याने त्याला नेटिजन्सकडून ट्रोल केलं जात आहे. आतापर्यंत शिंदे गटाच्या नेत्यांच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचे फोटो नव्हते. मात्र निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर फडणवीस यांचा फोटो आल्याने त्याला नेटिझन्सकडून आक्षेप घेण्यात येत आहे.

सोशल मीडियावर चर्चा

गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामुळे शिंदे गट वेगळा झाला तेव्हापासून ते एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो फेसबूक पेजवर वापरत होते. गेल्या तीन दिवसांपूर्वीसुद्धा ते बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या तिघांचे फोटो वापरत होते. परंतु, आता त्यांनी या तीन फोटोंसोबतच देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही वापरला आहे. त्यामुळं सोशल मीडियावर याची मोठी चर्चा सुरू झाली.

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो केला अॅड

तीन दिवसांपूर्वी शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळालं. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. पण, शिंदे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आपलंच असल्याचं जाहीर केलं. सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही, अशा आशयाचे पोस्टर गुलाबराव पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केलं. नेहमी प्रमाणे त्यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे याचे फोटो वापरले. पण, त्यात आणखी एका फोटोचा त्यात समावेश केला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा. तिथूनंच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.