जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, घडामोडींना वेग

जळगावमधून (Jalgaon) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलीय.

जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 5:19 PM

जळगाव : जळगावमधून (Jalgaon) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. तसेच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केलीय. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाची जळगावातील ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या तेव्हादेखील मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. सुषमा अंधारे यांनी त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे तरुण तडफदार नवा चेहरा त्या निमित्ताने समोर आला. जळगावातील शरद कोळी नावाचा तरुणांची महाराष्ट्राशी ओळख झाली. शरद कोळी यांनी अतिशय आक्रमकपणे शिंदे गटावर निशाणा साधला. शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता.

हे सुद्धा वाचा

अखेर शरद कोळी यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यावेळी शरद कोळी यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. त्यानिमित्ताने जळगावच्या राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर कोळी यांना जळगावात भाषणास बंदी घालण्यात आली.

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर तोडघा निघणार?

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात समाविष्ट करुन घेतलं आहे. ठाकरे आणि शिंदे गटातला हा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पोहोचला आहे. दोन्ही ठिकाणी युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण आधी व्हॅकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण आलं. त्यानंतर आता पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण आलं. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर गेल्या तीन दिवसांसून सुनावणी सुरु होती. याल दरम्यान आज झालेली सुनावणी महत्त्वाची मानली जातेय.

ठाकरे गटाने हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का? असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना करण्यात आला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने त्यावर काहीच भाष्य केलं न. आता हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.