AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरद पवार 50 वर्षांपासून लोक तुम्हाला….’; अमित शाह यांचा पवारांवर हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावमधील सभेत आगामी निवडणूकीबाबत बोलताना सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी थेट शरद पवारांवर शाब्दिक हल्ला केला. पाहा नेमकं काय म्हणाले...

'शरद पवार 50 वर्षांपासून लोक तुम्हाला....'; अमित शाह यांचा पवारांवर हल्लाबोल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 05, 2024 | 7:02 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रामध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जळगावमध्ये सभा पार पाडली. जळगावमधील सागर पार्क या मैदानावर भाजप युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. घराणेशाहीवरून बोलताना शहा यांनी या दोन्ही नेत्यांना आपल्या मुलांना मुख्यमंत्री करायचं असल्याचं म्हणत घणाघाती टीका केली.

अमित शाहांचा पवारांवर निशाणा

शरद पवार यांना सांगतो. तुम्हाला 50 वर्षापासून लोक सहन करत आहे. 50 वर्षाचं सोडा. पाच वर्षांचा हिशोब पवारांनी द्यावा,  मोदींना तिसऱ्यांदा 400 पार देऊन विजयी करा. आम्ही त्यासाठी पूर्ण काम केलं आहे. काँग्रेसने व्होट बँकच्या लालचेत देशाच्या संस्कृतीला मागे टाकण्याचं काम केलं. या देशात राम मंदिर आधीच व्हायला हवं होतं. पण काँग्रेसने व्होट बँकेच्या भीतीने रामलल्लाला 70 वर्ष तंबूत ठेवलं. मोदींनी भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना केली. मोदींनी काशीविश्वानाथ कॅरिडोअर, वन रँक वन पेन्शन दिल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवल्याचं अमित शाहांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्रात तीन चाकी रिक्षा चालू आहे. तिचं नाव महाविकास आघाडी आहे. या रिक्षाचे तिन्ही चाके पंक्चर आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकत असल्याचं अमित शाह म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी