AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी यंत्रणेचा अजब न्याय; चुका अधिकाऱ्यांच्या आणि शिक्षा शेतकऱ्याला…

शेत जमीन भू-संपादित करताना भूमी अभिलेख विभाग तसेच रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त उपस्थितीत मोजणी करण्यात आलेली आहे.

सरकारी यंत्रणेचा अजब न्याय; चुका अधिकाऱ्यांच्या आणि शिक्षा शेतकऱ्याला...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 08, 2023 | 7:20 PM
Share

पाचोरा/जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण येथील शेतकरी काशिनाथ पाटील यांची शेतजमीन जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी संपादित करण्यात आली आहे.मात्र भू-संपादन करण्याआधीपासूनच त्यांच्या जमिनीवर आंबा आणि लिंबूची बाग आजही अस्तित्वात आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांनी फळ बागेचा उल्लेख भूसंपादन अहवालात केलाच नाही. त्यामुळे ते हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिली आहेत.

ही चूक लक्षात आणून देण्यासाठी काशिनाथ पाटील यांचा गेल्या वर्षभरापासून सरकारी यंत्रणेसोबत लढा सुरू आहे. या विषयासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती.

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेऊन यंत्रणेला या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नव्याने जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले होते.

परंतु यंत्रणेतील खालच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रत्यक्ष शेत जमिनीवर जाऊन मोजणी न करताच परस्पर अहवाल पाठवला होता.

काशिनाथ पाटील यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर आजही आंबा व चिकूच्या बागेचा उल्लेख आहे. तसेच फळबाग आजही शेतात अस्तित्वात आहे मात्र असं असतानाही सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र फळबागेचा उल्लेख केलेला अहवालामध्ये केला नसल्याने काशिनाथ पाटील मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत.

दरम्यान या प्रकरणासंदर्भात प्रांताधिकारी विजय बांदल यांनी सांगितले की काशिनाथ पाटील यांची शेत जमीन भू-संपादित करताना भूमी अभिलेख विभाग तसेच रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त उपस्थितीत मोजणी करण्यात आलेली आहे.

त्यांनी दिलेल्या अहवालावरूनच भूसंपादनाचा न्यायनिवाडा करून मोबदला देण्यात आलेला आहे त्यात काही चूक नसल्याचे प्रांताधिकारी सांगितले आहे. मात्र 7/12 वर आंबा आणि लिंबूच्या बागेचा उल्लेख असतानाही त्याचा मोबादला काशिनाथ पाटील यांना मिळाला नाही आता त्याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?