AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Water | जलजीवन मिशन योजना, आदिवासी पाड्यावर पोहचले पाणी! जिल्हा परिषदेनं काय केलं?

भिवापूर तालुक्यातील डोंगरगाव एक आदिवासी गाव. या गावात नागपूर जिल्हा परिषदेनं (Nagpur Zilla Parishad) टँकमध्ये पाणी भरण्याचे काम ॲटोमॅटिक पध्दतीनं सुरू केलं. आधी शेतावरुन आल्यानंतर दूरवर जावून महिलांना पाणी आणावे लागत होते. त्या त्रासातून आता मुक्ती मिळणार असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता.

Nagpur Water | जलजीवन मिशन योजना, आदिवासी पाड्यावर पोहचले पाणी! जिल्हा परिषदेनं काय केलं?
नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी-पदाधिकारी आदिवासी पाड्यावर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करताना.
| Updated on: Feb 24, 2022 | 3:32 PM
Share

नागपूर : देशाने स्वातंत्र्याची पंचाहत्तरावी ओलांडली. परंतु अजूनही आदिवासी दुर्गम भागातील परिस्थिती पहावी तशी बदलली नाही. गाव अजूनही मागासलेले आहे. जिल्ह्यातील डोंगरगाव या दुर्गम गावात सौर ऊर्जेवर आधारित नळ योजनेद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली. त्यामुळे गावातील शेतकरी, महिला, बाल, अबाल वृध्दांना झालेला आनंद पाहून यशाची पावती मिळाल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे (Zilla Parishad President Rashmi Barve) यांनी व्यक्त केले. भिवापूर तालुक्यातील आदिवासी बहुल डोंगरगाव-पुल्लर सोबतच तिडकेपार येथे जलजीवन मिशन (Jaljivan Mission Yojana) अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी नळ योजनेचे (piped water in tribal hills) लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पाच हजार लिटर क्षमतेचे टँक

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे जीवन मिशन योजनेंतर्गत ज्या गावांमध्ये पाण्याची असुविधा आहे. अशा गावांमध्ये पूर्णवेळ 24 तास पाण्याची सोय करण्याची कल्पना लक्षात घेण्यात आली. जिल्ह्यात सौर ऊर्जेवर आधारित नळयोजना कार्यान्वित करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. या योजनेंतर्गत 6 लाख 92 हजार खर्चून सौर ऊर्जेवर आधारित 5 हजार लिटर क्षमतेची टँक गावात बसविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समाज कल्याण सभापती नेमावली माटे, भिवापूर पंचायत समितीच्या सभापती ममता शेंडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल, उपकार्यकारी अभियंता निलेश मानकर यावेळी उपस्थित होते.

अखेर शुद्ध, स्वच्छ पाणी मिळाले

जीवन सुकर झाले, वेळ वाचला, दारिद्री जीवनातून मुक्तता झाली. विहिरीतून पाणी काढण्याची मेहनत वाचली. जनावरांच्या पाण्याची सोय झाली, अशा आणि अशा अनेक समस्यांच्या मुक्तीसोबत शुध्द आणि स्वच्छ पाणी मिळाल्याच्या प्रतिक्रीया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रारंभी जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे जीवन मिशन योजनेंतर्गत तिडकेपार, ग्रामपंचायत भगवानपूर येथे 2 हजार लिटर क्षमतेची सौर ऊर्जा पंपावर आधारित नळयोजनेचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

Nagpur School | भीक मागा नि फीस भरा! मुख्याध्यापिकेची पालकांना धमकी, शिक्षण विभाग काय कारवाई करणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.