“पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही”; अवकाळीच्या नुकसानीनंतर या मंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश

नुकसानग्रस्त झालेल्या शेतीच्या पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सुचनाही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; अवकाळीच्या नुकसानीनंतर या मंत्र्याचे अधिकाऱ्यांना आदेश
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 8:50 PM

जालना : गेल्या दोन तीन महिन्यांपासून राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अवकाळी आणि गारपीट तर दुसरकडे शेत मालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी अनेकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.

आजही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे.

त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतीच्या नुकसानबाबत आणि पंचनामा करण्यासंदर्भात कडक शब्दात आदेश दिले आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावरून अधिकाऱ्यांना एकही शेतकरी या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन तुम्ही पंचनामे करा असे आदेश देण्यात आले आहेत. कृषीमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला व शेतकऱ्यांना धीरही दिला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार संतोष दानवे हेदेखील उपस्थित होते.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देशही मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नुकसानग्रस्त झालेल्या शेतीच्या पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सुचनाही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.