AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी मारून टाकीन म्हणतो, गोळ्या घालीन म्हणतो…; मनोज जरांगेच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. वाचा सविस्तर...

कुणी मारून टाकीन म्हणतो, गोळ्या घालीन म्हणतो...; मनोज जरांगेच्या विधानाने खळबळ
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 18, 2024 | 12:05 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनातील भीती त्यांनी बोलून दाखवली. अंतरवलीमधून मला हलू देत नाहीत. मी तिथे आंदोलन करतो. कुणी मला मारून टाकीन म्हणतो. कुणी गोळ्या घालीन म्हणतो… सरकार, पोलीस मराठ्यांच्या विरोधात आहे. सरकार आणि पोलिसांना वाटतं की घातपात झालं पाहिजे. दुसऱ्याचं झालं तर तातडीने कारवाई करून संरक्षण देतं. मात्र आम्हाला मारून टाकू द्या. आमच्याकडे लक्ष देत नाही. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो. आमचे लई हल आहे. मराठ्यांचा वेगळं हाल आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका

कॅबिनेट बैठक आहे का नाही माहित नाही. प्रत्येक वेळी शंका घेऊ नये. आपली तारीख 13 आहे. समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळावी. ओबीसी मराठा वादाची काय संबंध? ओबीसी आरक्षण असून ते रडत आहेl. आम्हाला तर आरक्षण नाही. त्यामुळे चौपट लढतील. आमचे लोक आता आपसातील भांडण मिटवून एक होतील. मिळू नये म्हणून एक झाली. आम्हाला मिळावं म्हणून एक होणार आहे. मराठ्यांच्या नेत्यांना उघडे डोळे घेऊन बघता का? मदत करणार नाही आमदार- खासदारांना उघडे पडणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

छगन भुजबळ याला मी टार्गेट केलं काही करेल. तुम्हाला अस म्हणायचं का आम्ही एकमेकांना भाऊ म्हणू नये? यासाठी आंदोलन उभे केले का? मी धनगर समाजाला आरक्षण देईल म्हणतो. तरी लोक आमच्या मागे नाही. मी सरकारला अंगावर घ्यायचं ठरवलं अन् तुम्ही लोकांचं एकूण खोटं लढत आहे. धनगर बांधवांच्या अडून हे लढत आहे.मी मात्र ओबीसीमधून घेतल्याशिवाय थांबणार नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न करा. इकडे मराठा आमदार खासदार येतंय. पत्र द्यायला लागले आहे. महाराष्ट्र समाज बघत आहे. जे येत नाही ते विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो. या एकजुटीचा समाजाला फायदा होईल. अधिवेशन आरक्षणासाठी गाजवत आहे. कोण पत्र घेऊन येत नाही त्यावर लक्ष आहे. आता भागलं मात्र अस वागला. तर पुढची तयारी मराठ्यांनी केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त