Children Covid Vaccination: जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात

Children Covid Vaccination: जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात
जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात

आज जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः उपस्थित राहून किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी मुलांचा उत्साह दिसून आला.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 03, 2022 | 11:25 AM

जालनाः महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते आज राज्यातील 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून किशोरवयीनांना प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (Children Covid Vaccination) केले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फक्त मास्क आणि लसीकरण ही दोनच अस्त्रे प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात असून आजपासून किशोरवयीनांचेही लसीकरण केले जात आहे. आज जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः उपस्थित राहून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली.

मुलांची विचारपूस, लसीकरणाला विशेष उपस्थिती

जालना येथील महिला व बालरुग्णालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला. या ठिकाणी 100 मुलांनी लसीकरणासाठी नोंद केली. राजेश टोपे यांनी सुरुवातीला लस घेणाऱ्या मुलांची विचारपूस केली, त्यांची नावं विचारली. लसीकरणासाठी प्रोत्साहन दिलं. राजेश टोपे यांच्या उपस्थितीत या रुग्णालयात 10 ते 12 किशोरवयीनांना कोरोना लस देण्यात आली. या मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. राज्यभरातील सर्वच किशोरवयीनांना कोव्हॅक्सीन हीच लस देण्यात येणार आहे. जालना तसेच विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी किशोरवयीनांचा उत्साह दिसून येत आहे.

इतर बातम्या-

फळ विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी भोवली, नाशकात 31 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Thane Children Vaccination | ठाण्यात ग्रामीण मुला-मुलींसाठी विशेष दहा लसीकरण केंद्रे, प्रशासनाची काय तयारी ?


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें