AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Children Vaccination | ठाण्यात ग्रामीण मुला-मुलींसाठी विशेष दहा लसीकरण केंद्रे, प्रशासनाची काय तयारी ?

लसीकरणादरम्यान गर्दी होऊ नये म्हणे ठाणे ग्रामीणमध्ये दहा विशेष लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या केंद्रांवर लस दिली जाईल.

Thane Children Vaccination | ठाण्यात ग्रामीण मुला-मुलींसाठी विशेष दहा लसीकरण केंद्रे, प्रशासनाची काय तयारी ?
vaccination
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:54 AM
Share

ठाणे : राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पालकांनी आपल्या मुलांना लसीकरणासाठी घेऊन यावे, असे आवाहन केले आहे. तसेच लसीकरणादरम्यान गर्दी होऊ नये म्हणे ठाणे ग्रामीणमध्ये दहा विशेष लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या केंद्रांवर लस दिली जाईल. लोकमत या मराठी वृत्तपत्रात याबाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीणसाठी दहा लसीकरण केंद्रे

आजपासून संपूर्ण भारतात 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोवीन वेबसाईटवर नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नावनोंदणी करता येईल. ठाणे ग्रामीण भागात केंद्राच्या सूचनेनुसार लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण भागात दहा विशेष लसीकरण केंद्रांची उभारणी केली गेलीय.

ग्रामीण मुलांना या लसीकरण केंद्रांवर लस मिळणार

जिल्हाभरातील ग्रामीण भागातील किशोरवयीन मुला-मुलींना सहजपणे लस उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने दहा लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे

♦ ठाणे जिल्हा रुग्णालय

♦ उपजिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी

♦ ग्रामीण रुग्णालय मुरबाड

♦ शहापूर तालुक्यातील वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्र

♦ अंबरनाथ तालुक्यातील वांगणी आरोग्य केंद्र

♦ कल्याण तालुक्यातील खडवली आरोग्य केंद्र

♦ भिवंडी तालुक्यातील आनगाव आरोग्य केंद्र

♦ मुरबाड तालुक्यातील शिवळा आरोग्य केंद्र

♦ जीवनदीप कॉलेज गोवेली

♦सेक्रेड हायस्कुल

इतर बातम्या :

मुंबईत 9 लाख किशोरवयीन मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

आई किचनमध्ये, पाच भावंडं टीव्ही बघण्यात गुंग, पाण्याच्या बालदीत पडून भिवंडीत चिमुकल्याचा मृत्यू

Nagpur Corona Vaccination | लहान मुलांच्या लसीकरणासाठी नागपूर प्रशासन सज्ज; लस कोठे मिळणार ? पूर्ण माहिती एका क्लिकवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.