AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षांतर्गत गटबाजी उफाळली, शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, जयंत पाटील प्रचंड संतापले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या जालना येथील कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. विशेष म्हणजे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंचावरच होते. पण तरीदेखील यावेळी पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली.

पक्षांतर्गत गटबाजी उफाळली, शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, जयंत पाटील प्रचंड संतापले
जयंत पाटील
| Updated on: Aug 18, 2024 | 10:33 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमात आज मोठा गोंधळ उडाला. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. त्यामुळे भर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे सभागृहात गोंधळ सुरु होता. गोंधळ शमत नसल्यामुळे अखेर जयंत पाटील संतापले. यानंतर सभागृहात शांतता पसरली. संबंधित घटनेबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. या घटनेनंतर जयंत पाटील यांनी भाषण केलं. पण त्यांनी भाषणात गोंधळाबाबत काही म्हटलं नाही.

नेमका गोंधळ का झाला?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली. जाफराबाद येथील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष सुरेखा लहाने यांचे भावी आमदार अशा आशयाचा युवकांनी पोस्टर झडकवताच चंद्रकांत दानवे यांचे समर्थक प्रचंड संतापले, आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, भर सभेत जयंत पाटलांच्या उपस्थितीत दहा एक मिनिट हा गोंधळ सतत सुरू राहिला. हा गोंधळ जयंत पाटील पाहत राहिले.

शेवटी जयंत पाटील कार्यकर्त्यावर प्रचंड संतापले आणि इथं मी भाषण करणार नाही, मला बेशिस्तपणा आवडत नाही. तुमच्या ज्या भावना आहे त्या पक्षापर्यंत पोहोचवा. मात्र बेशिस्तपणा अजिबात खपवला जाणार नाही, असं म्हणत जयंत पाटील चिडले. गोंधळ शांत झाल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषण उरकलं. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या सभेत भोकरदन येथील पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली.

जयंत पाटील भाषणात काय म्हणाले?

मराठवाड्याचा मोठा नेता पडत नाही, असं वाटत असलेला नेत्याला पाडण्याचा काम तुम्ही केलं. संपूर्ण मराठवाड्यात भाजपला तुम्ही हरवले. सरकार घाबरलेलं आहे, नाहीतर हरियाणासोबत राज्याची विधानसभा निवडणूक घेतली असती. मागच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला याचे करणे शोधा आणि सुधारणा करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमी शरद पवारांचा अपमान करतात आणि आमच्यातले गेलेले ऐकून घेतात. स्वाभिमान राहिला नाही, आतातर कंपनी लावली. कंपनीच्या सल्ल्यावर चालत आहे, माणुसकी जिव्हाळा सगळं संपल आहे. मराठवाड्यात ही शेवटची सभा आहे. राजकारणात संयम असणे गरजेचे आहे. माझ्या विरोधात जे जे निवडणूक लढले ते पुढच्या निवडणुकीत माझं काम करतात. ही विधानसभा जिंकायची हे विसरू नका. महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर उमेदवार घोषित होईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.