AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोप करणाऱ्या जिवलग मित्रावर मनोज जरांगेंचा पलटवार; म्हणाले, हा तर मुख्यमंत्र्याचा…

Manoj Jarange Patil on Ajay Maharaj Baraskar Allegation : उपोषणाच्या 13 व्या दिवशी मनोज जरांगेंचा माध्यमांशी संवाद; अजय महाराज बारसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर. जिवलग मित्राच्या आरोपांना मनोज जरांगे यांनी काय उत्तर दिलं? आंदोलनाबाबत मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आरोप करणाऱ्या जिवलग मित्रावर मनोज जरांगेंचा पलटवार; म्हणाले, हा तर मुख्यमंत्र्याचा...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Feb 22, 2024 | 12:11 PM
Share

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी जालना | 22 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नाही, अशी जरांगेंची भूमिका आहे. पण काल मनोज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले.किर्तनकार आणि मनोज जरांगे यांचे जिवलग मित्र अजय महाराज बरासकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं.

बारसकरांवर पलटवार

आज माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजय महाराज बरासकर यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. अजय बरासकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत. बारसकरने बोलताना एक शब्द वापरला आहे. तो मराठा बांधवांनी आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो म्हणाला की, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालेल. एक बळी असा राहिल की जो तुकाराम महाराजांसाठी मेला. न्याय देण्यासाठी मेला. पण हा न्याय देण्यासाठी मरणाऱ्यातला नाहीये. याची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीय, असं मनोज जरांगे म्हणाले.

बारसकरांवर गंभीर आरोप

एक कोणतंतरी संस्थान आहे. त्याच्या नावाखाली याने लोकांकडून 300 कोटी रूपये जमा केलेत. याचं मूळ गाव वेगळं आहे. भिशी घेऊन पळून गेला हा दुसऱ्या गावात गेला. जरांगेंवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांचं नाव घेऊन मरतो म्हणायचं पण तू तुकाराम महाराजांसाठी नाही मरायला लागला. तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहेस. तू इतके कुटाणे केलेत की तू मरणारच आहेस. असं मरण्यापेक्षा याला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन सहानुभूती घेऊन मरायचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

आंदोलनाची पुढची दिशा काय?

पुढच्या आंदोलनावरही जरांगेंनी भाष्य केलं. तीन मार्चला रास्तारोको होणार आहे. हा रास्तारोको शांततेत होणार आहे. तीन मार्चला असणारे लग्न सोहळे संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...