Manoj Jarange : अंतरवाली सराटीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकाएक गोंधळ, उडाली एकदम धावपळ, झालं तरी काय?

Antarwali Sarati Maratha Meeting : आज रविवारी, 21 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आले होते. पण एकाएक गोंधळ उडाला. जो तो सैरभैर पळू लागला. झाले तरी काय?

Manoj Jarange : अंतरवाली सराटीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकाएक गोंधळ, उडाली एकदम धावपळ, झालं तरी काय?
अंतरवाली सराटी, मराठा समाज बैठक
| Updated on: Sep 21, 2025 | 1:30 PM

Bee attack in meeting : मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत बैठकीचं आयोजन केलं होतं. आज, रविवारी, 21 सप्टेंबर रोजी ही बैठक बोलाविण्यात आली होती. पण या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला झाला. बैठकीसाठी आलेल्या काहीजणांना मधमाशांनी चावा घेतल्याचे, दंश केल्याची माहिती समोर येत आहे. मराठा कार्यकर्त्यांनी मग मनोज जरांगे यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंगावर बागायती रुमाल घेतल्याचे दिसून आले. त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. बैठकीच्या ठिकाणी मधमाशा (bee attack in antarwali sarati) आल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांची पण धावपळ दिसली.

आम्ही कुणाच्या आरक्षणाला विरोध करत नाही

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही असे वक्तव्य केले आहे. सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला हवे असे ते म्हणाले. याविषयीची चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे. तर इतर अनेक विषयांवर पण चर्चा होणार आहे. तालुक्यातील मराठा सेवकांची आणि मराठा समाजाला मदत करणाऱ्यांची ही बैठक आहे.

तर मग मोठा गोंधळ उडाला असता

अंतरावली सराटीत झालेल्या दंगलीच्या मागे शरद पवारांचा आमदार होता असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता, त्यावर आता जरांगेंनी उत्तर दिले आहे. जर आंदोलना मागे राजकीय लोक असती तर गोंधळ झाला असता दंगली घडल्या असत्या असं जरांगे म्हणाले आहे. तर आजच्या बैठकीसाठी अभ्यासक नाही, आज मराठा तालुका सेवक यांना बोलावले आहे. मराठवाड्यातील प्रमुख यांना बोलवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

छगन भुजबळांवर केली टीका

छगन भुजबळ यांना वाक्य शोभत आहे, विरोध करण्याची प्रथा त्यांनी सर्वात आधी आणली. मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही, येवला अलिबाबने नवीन योजना काढली, मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत, त्याला आणि आणखी एक दोघांना ते वाक्य शोभते अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस मराठाविरोधी

राहुल गांधी आणि काँग्रेसने मराठा समाजाच्या खूप विरोध सुरू केला आहे. तुम्हला अजून मराठा माहीत नाही, महाराष्ट्रात काँग्रेसला वाटुळू करून घ्यायचे आहे का? काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मराठा आरक्षण विरोध सुरू केला आहे. तुम्हाला औषधला राहू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर दिला.