AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : लाडकी बहिण, भाऊ योजनेचे काढले मोजमाप, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषणाचे हत्यार

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला. तर सरकारच्या लाडक्या योजनांचा पण समाचार घेतला.

Manoj Jarange Patil : लाडकी बहिण, भाऊ योजनेचे काढले मोजमाप, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषणाचे हत्यार
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jul 20, 2024 | 10:44 AM
Share

लाडक्या योजनांवरुन सरकारच्या धोरणांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तुफान हल्लाबोल चढवला. सरकारच्या योजनांचे मोजमाफच त्यांनी काढले. लाडकी बहिण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी योजना पण सरकार आणले, असा टोला त्यांनी लगावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी यावेळी शासनाच्या दुटप्पी धोरणावर हल्लाबोल चढवला.

सरकारने दिला धोका 

सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी यावेळी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. पोलीस भरतीत सरकारी अधिकारी जातीयवाद करत असल्याचे ते म्हणाले. हिंगोली पोलीस भरती दरम्यान एका प्रकरणाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. मराठा तरुणाला ओबीसी प्रवर्ग बदलवून खुला प्रवर्ग लिहायला लावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

लाडक्या योजनांवर टीका

लाडकी बहिण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी अशी योजना पण आणा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. या योजनांसह इतर योजनांचे पैसे येण्यासाठी किती कालावधी लागतो, याची त्यांनी उजळणी केली. 1500 रुपयांसाठी सरकारच्या संकेतस्थळावर उड्या पडल्याने त्यांची सेवा कोलमडली. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

जरांगे पाटील मागण्यांवर ठाम

आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता. आम्ही तेवढा दिलेला आहे. आमचे सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत सगळे सोयरे आंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकत येत काय कामाला माहित नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004 चा कायदा आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. कारण कुणबी व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे रोटी बेटी व्यवसाय होतात. मराठा आणि कुणबी एकच आहे. या मागणीत बदल केलेला नाही. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या मागण्यांसाठी उपोषणाचे उपसले हत्यार

सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा.

हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आहे.

अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे. अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.