AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | महायुतीला तडा! सदाभाऊ खोत यांच्याकडून जाहीर नाराजी व्यक्त

आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारला घरचा आहेर दिल्याची बातमी ताजी असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे खंत व्यक्त करत भाजपला इशारा दिला आहे.

BIG BREAKING | महायुतीला तडा! सदाभाऊ खोत यांच्याकडून जाहीर नाराजी व्यक्त
| Updated on: Jun 20, 2023 | 10:47 PM
Share

जालना : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि भाजप-शिवसेनेचं सरकार आलं. या दरम्यान मंत्रिमंडळाचा फक्त एकाच वेळी विस्तार पार पडलाय. दुसऱ्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा आहे. या विस्तारात कुणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार बच्चू कडू यांनी या विषयावरुन तर सरकारची विस्तार करण्याची क्षमताच नाही, असं म्हणत सत्ताधारी पक्षांना घरचा आहेर दिला आहे. असं असताना आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे खंत व्यक्त करत भाजपला इशारा दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी भाजपला इशारा दिलाय. “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घटकपक्षाची केव्हा आठवण येते ते बघू”, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. “आम्ही भाजप बरोबर आहोत. पण भाजप आमच्याबरोबर आहे, असं आम्ही म्हणत नाहीत”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी ही खंत व्यक्त केली.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

“राज्यात महायुतीचं सरकार आलं. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अजून घटकपक्षांची आठवण झालेली नाही. बैठक बोलवायची की अजून आमचा नंबर आलेला नाही हे मला समजलेलं नाही. पण प्रत्येकाची वेळ येते”, असा इशारादेखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

“आता आम्ही म्हणतोय की भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. पण ते काही म्हणाले नाहीत की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण आम्ही म्हणतोय त्यांच्याबरोबर आहोत”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपवर अनेक पक्ष नाराज?

भाजप आणि मित्रपक्ष यांच्यात मतभेद होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील मित्रपक्षांमधील नाराजीच्या बातम्या समोर आल्या आहेत. याच नाराजीतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप एकमेकांचे राजकीय शत्रू बनले. सदाभाऊ खोत यांच्यासारखंच राजकीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीदेखील अनेकदा नाराजी जाहीर केली आहे. याशिवाय देशभरात अनेक ठिकाणी भाजपसोबत मैत्री केलेल्या पक्षांनी भाजपप्रणित युती तोडल्याचं बघायला मिळालं आहे.

आगामी काळात राज्यात आणि देशात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजू शकतं. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.