Evaporation : जायकवाडी धरणाचे 8 टीएमसी पाण्याचे होते बाष्पीभवन; मराठवाड्याला पाणी पुरणार का?

Evaporation : जायकवाडी धरणाचे 8 टीएमसी पाण्याचे होते बाष्पीभवन; मराठवाड्याला पाणी पुरणार का?
जायकवाडी धरण
Image Credit source: tv9

दरम्यान गेल्यावर्षी वरूण राजाने औरंगाबाद, जालना, नगर, बीड जिल्ह्यातील लोकांवर आपली कृपा केली आणि दमदार पाऊस झाला. ज्यामुळे जायकवाडी पुर्ण क्षमतेने भरले होते.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 20, 2022 | 5:37 PM

पैठण : उन्हाळा आला की धरणाकडे राज्यातील जनतेचे लक्ष जाते. कारण राज्यातील नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी (Agriculture) प्रामुख्याने पाण्याची गरज भासते. तर उद्योग क्षेत्रालाही पाणी मुबलक लागते. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरनातील पाण्याची पातळी ही पाहीली ही जाते. तर किती पाणी शिल्लक आहे त्यावर पाण्याचे नियोजन करण्यात येते. तर या वर्षी देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर उष्मा वाढला होता. ज्यामुळे नागरिक हैराण झाले होते. तर राज्यात ही उष्णतेच्या लाटेचा सामना जनतेला करावा लागला. याचा सगळ्यात जास्त फटका हा मराठवाडा आणि विदर्भाला बसला. त्यामुळे लोकांची पाण्याची मागणी ही वाढली होती. मराठवाड्याचे बोलायचे झाल्यास जायकवाडी धरणाकडे (Jayakwadi Dam) तहान भागवणारा प्रकल्प पाहिले जाते. मात्र या धरणाचे पाणी उडून जात असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर जायकवाडी धरणात 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. तर वर्षभरात 10 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation)होत असल्याचे म्हटले जात आहे. ज्याचा बाष्पीभवनाचा स्पीड हा प्रतिसेकंद सुमारे 250 क्यूसेक पाणी आहे.

पाण्यीचे बाष्पीभवन

जायकवाडी धरणातील पाण्यीचे बाष्पीभवन होत असून आतापर्यत 8 टीमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. तर येथील पाणी हे पिण्यासह औद्योगिकीकरणासाठी मोठ्याप्रमाणावर वापरले जाते. तर बाष्पीभवनामुळे धरणातील 8 टीमसी पाणी गेल्याचे ऐकून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

औरंगाबाद, जालना, नगर, बीड या धरणावर

औरंगाबाद, जालना, नगर, बीड जिल्ह्याची तहान जायकवाडी धरण भागवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी हे धरण पुर्ण क्षमतेने भरावे अशी अवलंबून असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची इच्छा असते. मात्र येथे पडणाऱ्या पावसामुळे कधी कधी ते भरते तर कधी कधी पाण्यासाठी लोकांना टाहो फोडावा लागतो. दरम्यान गेल्यावर्षी वरूण राजाने औरंगाबाद, जालना, नगर, बीड जिल्ह्यातील लोकांवर आपली कृपा केली आणि दमदार पाऊस झाला. ज्यामुळे जायकवाडी पुर्ण क्षमतेने भरले होते.

250 क्यूसेक पाणी हे हवेत विरत

तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून दररोज प्रतिसेकंद सुमारे 250 क्यूसेक पाणी हे हवेत विरत असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे सुमारे दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. तर आतापर्यंत 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. तर वर्षभरात 10 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

43 टक्के पाणीसाठा शिल्लक

एप्रिल महिन्यातच मराठवाड्याचे तापमान हे 40 डिग्री झाले होते. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन हे होते. तर मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने साहजीकच तापमानात वाढ झाली होती. ज्यामुळे 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले. तर मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 2470 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीमध्ये तब्बल 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा शेती, पिण्यासाठी, उद्योगासाठी वापर करण्यात येतो. जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना शहराला पिण्यासाठी, उद्योगाला पाणी देण्यात येत असल्यामुळे दररोजच्या पाणीसाठ्यातही घट होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें