‘मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है’, जयंत पाटलांकडून तेजस्वी यादवांचं कौतुक

तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी अभिनंदन ! Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है', जयंत पाटलांकडून तेजस्वी यादवांचं कौतुक
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:02 PM

मुंबई : बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. यासंबंधी जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. (Jayant Patil appreciate Tejashwi Yadav in bihar assembly election)

तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी अभिनंदन ! Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांनी ‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।’ अशी शायरी सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिलं आहे.

खरंतर, तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणुकीत बिहारमधील महापूर, शेल्टर होम कांड, कोरोना, बेरोजगारी अशा बिहारच्या जनमनातील मुद्द्यांना हात घातला. RJDने लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत ही निवडणूक लढवली. अशा स्थितीतही तेजस्वी यादव यांनी दिलेला लढा पाहून बिहारच्या रणसंग्रामात आता ‘लालू चा लाल’ उदयाला आल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. मात्र, तेजस्वी यांना गंभीरपणे न घेण्याची चूक नितीश कुमारांना चांगलीच महागात पडली आहे. (Jayant Patil appreciate Tejashwi Yadav in bihar assembly election)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडूनही तेजस्वी यादव यांच्या कामाचं कौतूक करण्यात आलं आहे. ‘बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी RJDचे नेते तेजस्वी यादव यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

“बिहारमध्ये तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. पण तिथे अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. बिहारमध्ये भाजप विरुद्ध एकटे तेजस्वी यादव अशीच निवडणूक पाहायला मिळाली. तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पंतप्रधान, केंद्रातील अनेक मंत्री, स्थानिक राजकीय पक्ष आणि प्रशासनाची ताकद होती, अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

इतर बातम्या –

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!

बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार

(Jayant Patil appreciate Tejashwi Yadav in bihar assembly election)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.