Jayant Patil : राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसराच कुणी तरी ऑपरेट करतोय; जयंत पाटील यांचा आयोगावर गंभीर आरोप
आम्ही दुपारनंतर नाव चेक केलं. तेव्हा ६ वाजता सुषमा गुप्ता यांचं नाव त्यातून काढलं गेलं. न्यूज चॅनलने बातमी दाखवली. तुम्हीच पुरावा दाखवला. दुपारी ३ वाजता नाव असतं. संध्यकाळी ६ वाजता हे नाव काढलं. ही नावे कुणी काढली, कुणी स्थळ पाहणी कोणी केली.

मतदार यांद्यावरून गोंधळ, बोगस मदतान असे अनेक मुद्द गाजत असतान काल (मंगळवार) आणि विरोध पक्षातील अनेक प्रमुक नेत्यांनी निवडमूक अधिकारी व आयुक्तांची भेट घेऊन निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली. काल निवडणूक अधिकाऱ्यांना निवगेनही देण्यात आले. आजही त्यांची उर्वरित बैठक पार पडली. त्यात अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. यानंतर विरोध पक्षाच्या नेत्यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. णनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगवर काही गंभीर आरोप केलेत. राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
काय म्हणाले जयंत पाटील ?
काल आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटायला गेलो होतो. त्यांना निवेदन दिलं. निवेदनात त्यांना राज्यातील मतदार याद्यातील अनंत चुका दाखवल्या. त्यानंतर सीईओ यांनी आश्वासन दिलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला म्हणणं पाठवतो. याद्या दुरुस्त करण्यासाठी सुरुवात करू अस जयंत पाटील यांनी सांगितलं.
राज्य निवडणूक आयोगाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, असं सीईओंनी सूचवलं. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. सर्व विरोधी पक्षनेते सोबत गेलो. आम्ही काही पुरावे दाखवले. त्या पुराव्यासहीत आम्ही काही माहिती दिली. या पुराव्याबरोबरच त्यांना पत्रही दिल्याचं जयंत पाटील म्हणाले. हे पत्र देत असताना मतदार यादीत मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे, संबंधित व्यक्ती त्या पत्त्यावरच नाही असं ते म्हणाले.
मी काही उदाहरणं दिली. मुरबाड मतदारसंघात बुथ क्रमांक ८ मध्ये ४०० मतदार आहेत. त्यांच्या घरासमोर डॅश आहे. बडनेरा बुथ क्रमांक २११ मध्ये घर क्रमांक शून्य, कामठीतही ८६७ मतदारांचा घर क्रमांक निरंक आहे. काही ठिकाणी दुबार नावे, पाच पाच वेळा मतदान करण्याचा हक्क अनेक मतदारांना दिलाय. नालासोपारात सुषमा गुप्ता या महिलेचं नाव सहा वेळा नोंदवलं आहे. पुराव्यासह दाखवलं होतं असंही त्यांनी नमूद केलं.
राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय
आम्ही दुपारनंतर नाव चेक केलं. तेव्हा ६ वाजता सुषमा गुप्ता यांचं नाव त्यातून काढलं गेलं. न्यूज चॅनलने बातमी दाखवली. तुम्हीच पुरावा दाखवला. दुपारी ३ वाजता नाव असतं. संध्यकाळी ६ वाजता हे नाव काढलं. ही नावे कुणी काढली, कुणी स्थळ पाहणी कोणी केली. तक्रार कोणी केली. व्हेरिफिकेशन करण्याच्या आत नावं काढलं. राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी तरी चालवतोय असा दावा जयंत पाटील यांनी केला. आमचा समज आहे. मतदार याद्यात दुसरा कोणी तरी नाव घालतो. नाव काढतो. कुणी तरी बाहेरचा व्यक्ती सिस्टिम ऑपरेट करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिली नाही, असा आमचा समज झाला आहे असेही ते म्हणाले.
