AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद, प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर उमेदवाराची विमानतळावर दांडी

raver lok sabha constituency: जळगाव विमानतळावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी इतर सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला.

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद, प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर उमेदवाराची विमानतळावर दांडी
जयंत पाटील
| Updated on: Apr 20, 2024 | 11:01 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान संपले आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे वेध लागले आहे. या निवडणुकीत उमेदवारींवरुन सुरु झालेले नाराजी नाट्य अजूनही थांबले नाही. महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला गेली. या ठिकाणी भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादीतील ही खदखद दूर करण्यासाठीराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात दाखल झाले. परंतु ते आल्यावर रावेर लोकसभेचे उमेदवार विमानतळावर गेले नाही. तसेच बैठकीला सर्वात शेवटी दाखल झाले.

श्रीराम पाटील उशिराने दाखल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका हॉटेल पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परंतु ज्या उमेदवारासाठी बैठक घेत आहेत ते रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील बैठकीला सर्वात शेवटी उशिराने पोहोचले. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सुद्धा बैठकीला हजर असल्याने चर्चा आहे.

विमानतळावर श्रीराम पाटील गैरहजर

जळगाव विमानतळावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी इतर सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला.

संतोष चौधरी यांची नाराजी दूर होणार

रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी इच्छूक होते. परंतु या ठिकाणी भाजपमधून एका दिवसापूर्वी आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे श्रीराम पाटील भाजपमध्ये फेब्रुवारी महिन्यात गेले होते. श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतोष चौधरी आणि त्यांचे समर्थक नाराजी आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. आता जयंत पाटील संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का? हा प्रश्न आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.